कोरोना पार्श्वभूमीवरील नियमांचे दुकानदार, व व्यापारी बांधवांतर्फे काटेकोरपणे पालन, नगरपालिका प्रशासन व पोलीस विशेष लक्ष ठेऊन

कोरोना पार्श्वभूमीवरील नियमांचे दुकानदार, व व्यापारी बांधवांतर्फे काटेकोरपणे पालन, नगरपालिका प्रशासन व पाचोरा पोलीस स्टेशन विशेष लक्ष ठेउन

पाचोरा आज पासून दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत बंदला उस्फुर्त प्रतिसाद व्यापारी दुकानदार व व्यावसायिक बंधुनतर्फे काटेकोरपणे पालन करून सायंकाळी सात वाजता पाचोरा शहरातील दुकाने बंद करून आपले योगदान देऊन कोरोनाच्या संघर्षमयी लढाईत सामील होताना पाचोरा मधील सर्वच बांधव दिसत आहे, पोलीस प्रशासन मोलाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे, तसेच पाचोरा नगरपालिकेतील कर्मचारी या नियमांचे पालन न करणाऱ्या बंडखोरान्वर कारवाई करून दंड वसूल करीत आहेत, यात मेडिकल्स, दूध, किराणा अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद करण्यात आले आहे.
यावेळी डी. वाय. एस. पी. भारत काकडे साहेब, पी.आय. नजन पाटील साहेब, पी. एस. आय, गणेश चौबे साहेब, राहुल पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील, जगताप पाटील, बापू पाटील, नितीन सूर्यवंशी, सुनील पाटील, नगरपालिका कर्मचारी अनिल वाघ, भिकन गायकवाड, प्रशांत कंडारे, आदी अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेऊन होते,