पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य वाणी युवा मंच तर्फे समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार

पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य युवा मंच तर्फे समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला

( पाचोरा प्रतिनिधि अनिल आबा येवले )

पाचोरा येथील महाराष्ट्र वाणी युवा मंच तर्फे गेल्या बारा वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाजातील जेष्ठ नागरिक यांचाही सत्कार केला जातो. महाराष्ट्र युवा मंचतर्फे दहावी ते ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेन ग्रॅज्युएट व शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व बक्षीस देऊन सत्कार केला जातो.तसेच विविध क्षेत्रात उदा.शैक्षणिक, सामाजिक,राजकीय व सहकार क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांचा देखील सत्कार केला जातो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.यादवराव विठ्ठल सिनकर सर (आदर्श शिक्षक) हे होते. श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथील ज्येष्ठ शिक्षक श्री.गणपत वाणी सर यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला
सदर कार्यक्रमात महाराष्ट्र वाणी युवा मंच प्रदेशाध्यक्ष श्री.राजेंद्र पाचपुते धुळे, श्री.प्रकाश मधुकर येवले (प्रसिद्ध व्यापारी, पाचोरा),श्री.अनिल सिनकर (मनमाड), प्रा.श्री.राजेंद्र चिंचोले सर, श्री.डी.आर.कोतकर सर (संस्थापक शाखाध्यक्ष), श्री.अशोक बागड (शाखाध्यक्ष), श्री.शरद पाटे,ज्येष्ठ संघटक श्री.किरण अमृतकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री.गणपत वाणी सर यांनी मुलांना योग्य मार्गदर्शन दिले.श्री.अनिल सिनकर यांनी समाजाची प्रगती होण्यासाठी मार्गदर्शन केले.तसेच श्री.राजेंद्र पाचपुते यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी करता मार्गदर्शन करताना सांगितले समाजातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षणात भाग घेऊन उच्च पदावर जावे.अध्यक्षीय भाषणात श्री.यादव सिनकर सर यांनी समाजात युवा मंचच्या सदस्यांनी चांगला उपक्रम राबवला.त्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच त्यांनी सांगितले की विद्यार्थी हे गुणवंत,ज्ञानवंत, भाग्यवंत असून त्यांचा गुणगौरव केलाच पाहिजे. तसेच संस्कार केले, तर संस्कृती टिकेल.संस्कृती टिकली,तर धर्म टिकेल. धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल. असेही ते शेवटी आपल्या भाषणात म्हणाले.सदर कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्यांना लकी ड्रॉ द्वारे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अशोक बागड यांनी केले.तर श्री.डी.आर.कोतकर सर यांनी युवा मंच चे अहवाल वाचन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री.लक्ष्मण सिनकर सर, श्री.रमेश महालपुरे सर तसेच श्री योगेश शेंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम श्री.गणेश सिनकर यांनी केले. सदर कार्यक्रमास म.वाणी युवा मंच उपाध्यक्ष श्री.महेंद्र महालपुरे, खजिनदार श्री.रमेश महालपुरे सर, , कार्यकारणी सदस्य श्री.विवेक ब्राह्मणकर, श्री.प्रवीण शेंडे, श्री.संजय शेंडे, श्री.विजय सोनजे, श्री.संदीप महालपुरे , श्री. विशाल ब्राह्मणकर, श्री.सुनील कोतकर इत्यादी जणांनी अथक परिश्रम केले.सदर कार्यक्रमास समाज बांधव भगिनी व बक्षीस पात्र विद्यार्थी,विद्यार्थिनी आणि त्यांचे कौतुक पाहण्यासाठी आलेले त्यांचे पालक असे जवळपास 200 पेक्षा जास्त जण उपस्थित होते.