भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी चा पाचोऱ्यात निर्धार हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी चा पाचोऱ्यात निर्धार हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार

पाचोरा(प्रतिनीधी)

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मततेसाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा – तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सह शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सहभागी होण्याचा आज १८ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्राम गृहात निर्धार करण्यात आला. पाचोरा तालूका काॅग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी बोलविलेल्या महाविकास आघाडिच्या बैठकीत राष्टवादी काॅग्रेसचे नेते माजी आ. दिलिप वाघ,शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी सह राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजर खान,रणजित पाटील, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन ,महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील,मुकेश तुपे, गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, तालुका एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, अजबराव काटे, रवींद्र महाजन, अमरसिंग पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, अतुल चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी पाचोरा शहर आणि ग्रामीण भागातील जनतेने सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी च्या नेत्यांनी सामुहिक आवाहन केले आहे. शेगाव जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्याशी दि १४ नोव्हेंबर पर्यंत संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले.