गणिताचा नवा रामानुजन : ऋतुराज रावसाहेब मिस्तरी

गणिताचा नवा रामानुजन : ऋतुराज रावसाहेब मिस्तरी

दिनांक 5 ते 6 जानेवारी 2023 रोजी डी.डी.बिटको बॉईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाशिक येथे शालेय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. त्यात विविध विद्यार्थी/ विद्यार्थी नी सहभाग घेतलेला होता. यात कु. ऋतुराज रावसाहेब मिस्तरी यांनी ( वयाच्या चौदाव्या वर्षी ) इ.नववी तुकडी- अ या विद्यार्थ्यांने गणित या विषयात वर्ग काढण्याची नवीन अभिनव सूत्र शोधून काढले आहे. त्याबाबत त्याने त्याचे मॉडेल व त्याचे सविस्तर सादरीकरण उत्तम पद्धतीने केले. असून नाशिक येथिल अन्य शालेय शालेय ब विद्यार्थी व शिक्षकांनी कौतुक तसेच अभिनंदन केले. वर्ग काढण्याची नवीन सूत्र = C +ba, (b)² हे असून कमी वेळेत अमर्यादित अशा संख्येचे वर्ग काढून देण्याची नाविन्यपूर्ण सूत्र शोधून काढले आहे. या नव्या सूत्राचा उद्या गणिताच्या अभ्यासाकांसाठी जगभर उपयोग होणार आहे. प्रदर्शनासाठीमार्गदर्शन डी.डी. बिटको हायस्कूल चे मुख्याध्यापक मा. सुभाष महाजन सर व गणित व विज्ञान शिक्षक व इतर सर्व शिक्षक वृद्धांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. कु.ऋतुराज मिस्तरी याचा शाळेमार्फत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुढील स्तरावर त्याची निवड झालेली आलेली आहे. अनेक थरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांचे हे पुतणे आहेत.