शिक्षक समन्वय संघ पाचोरा तालुक्याच्या वतीने आ.किशोर पाटील यांची भेट घेतली

शिक्षक समन्वय संघ पाचोरा तालुकाचा वतीने पाचोरा व भडगांव मतदार संघाचे आ.किशोर पाटील यांची भेट घेतली

शिक्षक समन्वय संघाचे १० ऑक्टोबर पासून चालू असलेले आंदोलन व त्या पार्श्व भूमीवर २ नोव्हेंबर रोजी शिक्षणमंत्री ह्याचा सोबत झालेल्या भेटीचा तपशील सांगितला. शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर यांनी दिलेले आश्वासन सांगितले व लवकर शिक्षकांचा प्रश्न कसा निकाली लागेल ह्या बाबत मा.शिक्षणमंत्री ह्यांना विनंती करण्याचे मा.आमदार साहेबाना विनंती केली त्यावर मा.आमदार किशोर पाटील यांनी लगेच शिक्षणमंत्री यांना दूरध्वनीवरून केला व शाळांना लवकरच वाढीव ४०% व ६०% द्यावा ही विनंती केली त्यावर शिक्षणमंत्री साहेबांनी यावर युद्ध पातळीवर काम चालू आहे व येणाऱ्या १५ नोव्हेंबर पर्यंत यांचीअधिकृत घोषणा करू असे सांगितले.
आ.किशोर पाटील यांना निवेदन देताना शिक्षक उपस्थित होते  रत्नराज साळुंके सर,अरविंद पाटील सर,निलेश पाटील सर,राहुल पाटील सर,विजय पाटील सर,उमेश पाटील सर,ईश्वर पाटील सर