चोपडा महाविद्यालयात युवतीसभेच्या ‘ऋतुमती अभियाना अंतर्गत कार्यशाळेचे’ यशस्वी आयोजन

चोपडा महाविद्यालयात युवतीसभेच्या ‘ऋतुमती अभियाना अंतर्गत कार्यशाळेचे’ यशस्वी आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने युवतीसभेच्या ‘ऋतुमती अभियान अंतर्गत दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सुर्यवंशी यांचेही मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी हे उपस्थित होते तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.सौ. योगिता काटे व समुपदेशन तज्ञ सौ. उज्वला अतुल पाटील ह्या उपस्थित होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ.एस. ए. वाघ तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.डी. डी. कर्दपवार, युवतीसभा प्रमुख डॉ.सौ. प्रिती रावतोळे, डॉ. सौ क्रांती क्षीरसागर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्री कै.ना. अक्कासो.शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिपप्रज्वलन करून या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक युवतीसभा प्रमुख डॉ. सौ प्रिती रावतोळे यांनी केले तर वक्त्यांचा परिचय डॉ. सौ क्रांती क्षीरसागर व सौ आरती बी. पाटील यांनी करून दिला.
यानंतर पहिल्या सत्रात सौ. डॉ.योगिता काटे यांनी युवतींच्या समस्या तसेच तारुण्यात होणारे शारीरिक बदल व आरोग्याची घ्यावयाची काळजी या बाबत सखोल मार्गदर्शन केले.त्यात त्यांनी ऋतुमती असताना आपला आहार संतुलित ठेवावा, ताण- तणाव व्यवस्थापन करणे, व्यायाम करणे गरजेचे आहे. याप्रसंगी त्यांनी PCOD, thyroid, hormonal imbalance, insulin resistance व diabetes या आजारांची लक्षणे व उपाय या विषयावर मार्गदर्शन केले तसेच मुलींशी चर्चा करून त्यांचे प्रश्न व समस्यांचे निराकरण केले.
दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्त्या समुपदेशन तज्ञ सौ.उज्वला अतुल पाटील यांनी युवतींची एकाग्रता व संयम तपासण्यासाठी व वाढवण्यासाठी मनोरंजन खेळाद्वारे मार्गदर्शनास सुरुवात केली. मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यासाठी मेडिटेशन गरजेचे आहे. प्रेम करताना फक्त शारीरिक आकर्षणाला महत्व न देता मर्यादा सांभाळाव्या.प्रेम हे क्षणिक नसून चिरकाल टिकणार असावे. तारुण्यात आपल्या पालकांशी मैत्री करा व मुलीनी आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आईशी मोकळेपणाने बोलावी.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बऱ्याच वेळेला मुला-मुलींमध्ये भेद केला जातो. परंतु आज स्री प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. अशा वेळी त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे, त्या बाबतीत जागरूक असणे अतिशय गरजेचे आहे.त्यामुळे विद्यार्थिनींसाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी जोशी यांनी केले तर आभार पूजा पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सौ संगीता पाटील, सौ. आर. पी. जैस्वाल, वैशाली सोनगिरे, सौ. हर्षा देवरे, प्राजक्ता वानखेडे, पूनम जैन, पूजा पाटील, पूजा सोनवणे, दर्शन पाटील, नीलेश भाट, विशाल बोरसे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सौ.अश्विनी सूर्यवंशी, सौ.पूजा पून्नासे, आशा शिंदे, शाहीन पठाण, जागृती पाटील, रश्मी जैन, कीर्ती अग्रवाल, भाग्यश्री सांगोरे, कल्याणी मांडेवाल, मयूरी पाटील यांच्या उपस्थितीसह बहुसंख्य विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी भगिनी उपस्थित होते.