भक्ती, वृत्ती आणि हरित संस्कृतीचा गजर -मा.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख आयोजन…!

भक्ती, वृत्ती आणि हरित संस्कृतीचा गजर -मा.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख आयोजन…!

 

पाचोरा : शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेनेच्यावतीने विविध सामाजिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना शिवसेना नेत्या मा. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या उपक्रमाची सुरुवात पवित्र अध्यात्मिक वातावरणात झाली. पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथील ऐतिहासिक महादेव मंदिरात सकाळी भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो व त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग अधिक विस्तीर्ण व्हावा, या भावना महाआरतीतून व्यक्त करण्यात आल्या.

यानंतर पारंपरिक भक्तिभावाने परिपूर्ण असलेल्या कावड यात्रेत मा. वैशालीताई सूर्यवंशी व मा. नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी स्वतः सहभागी होत शिवभक्तांसोबत चालत श्रद्धेचा आदर्श उभारला. या यात्रेदरम्यान निर्मल सीड्स समोरील श्रद्धेय तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या पुतळ्याजवळ हजारो कावड यात्रेतील शिवभक्तांना दूध वाटप करून शिवसेनेच्या सेवाभावी कार्याची प्रचीती दिली.

यानंतर हिरवाईचा संदेश देत, निसर्ग संवर्धनाचा विडा उचलण्यात आला. मा. वैशालीताई सुर्यवंशी व पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शिवसेनेच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रसंगी योजना ताई पाटील, मनिषा पाटील, निता भांडारकर, दिपक राजपूत, उद्धव मराठे, रमेश बाफना, पप्पू राजपूत, संदीप जैन, बंटी हटकर, प्रशांत पाटील, बंडू मोरे, चेतन पाटील, गजू पाटील, रतन परदेशी, रमेश पाटील, गोपाल परदेशी, महाजन, पप्पू दादा पाटील, भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील, दगडू पाटील, मनोज चौधरी, हरीश देवरे, भूषण पाटील, राजू मोरे, फकिरा पाटील, जितेंद्र महाजन आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सामाजिक व पर्यावरणीय विकास घडावा, हीच या उपक्रमामागील भूमिका होती, हे स्पष्टपणे जाणवत होते.