शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल

शिंदे इंटरनॅशनल स्कूल च्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल

शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनात
विद्यार्थ्यांची जनजागृती व मनोरंजक धम्माल

पाचोरा – येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन काल दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनातून विविध विषयांबद्दल जनजागृती सह वेगवेगळ्या मनोरंजक गीत व नृत्य द्वारे विद्यार्थ्यांनी खूप धम्माल केली.

शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन 13 रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले. महाराष्ट्र शासन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून संमेलनाची सुरुवात झाली. सरस्वती वंदना व गणेश वंदना सादर करण्यात आली.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सचिव ॲड. जे.डी. काटकर, सहकार नेते सतीश बापू शिंदे, भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल भाऊ शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुणोत, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, संस्थेच्या सी. ई.ओ.पूजाताई शिंदे, माजी पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील, प्राचार्य डॉ. विजय पाटील मंचावर उपस्थित होते संस्थेतर्फे उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रा शिवाजी शिंदे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. अमोल भाऊ शिंदे यांनी विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी विचार व्यक्त केले. उद्घाटक डॉ. श्यामकांत देवरे यांनी विद्यार्थी व पालकांचे कौतुक करत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.

सुमारे चार तास चाललेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध, झाडे वाचवा झाडे जगवा, चंद्रयान -३, नारी शक्ती हीच महान शक्ती, प्लास्टिक बंदी, हिंदू मुस्लिम एकता, राष्ट्रीय एकात्मता, शेती व शेतकरी, मराठी- हिंदी चित्रपट गीते आदी विषयांवर जनजागृती पर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच विविध मनोरंजनात्मक गीतांवर धमाल नृत्य सादर करत सुमारे 1050 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शिंदे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून केलेले सूत्रसंचालन या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. याद्वारे “भारतीय मूल्याधिष्ठित शिक्षणासोबतच आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा ध्यास” असलेले संस्थेचे ब्रीदवाक्य सार्थ ठरले. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या जीवन परिचया वरील चित्रफित दाखवण्यात आली. या कार्यक्रमासाठी गिरणाई शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनाला मोहसीन शेख यांचे मार्गदर्शन लाभले.