राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस वाढता प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस वाढता प्रतिसाद

पाचोरा ( प्रतिनिधी)
अडचणी व समस्या मांडून ग्रामस्थांकडून न्यायाची मागणी
पाचोरा_भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा कॄउबा समितीचे प्रशासक दिलीप वाघ यांनी सुरू केलेल्या जनसंवाद यात्रेस गावोगावी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आपल्या समस्या व अडचणी मांडून ग्रामस्थ न्यायाची मागणी करीत आहेत.
गेल्या दोन ऑक्टोबर रोजी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, संजय वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, यांचेसह जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कनाशी (ता भडगाव) येथून दिलीप वाघ यांच्या जनसंवाद यात्रेस प्रारंभ झाला. दररोज सकाळ व सायंकाळ विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी व समस्या समजावून घेऊन , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे समजावून देऊन भडगाव तालुक्यातील संपूर्ण गावे पूर्ण केल्यानंतर पाचोरा तालुक्यात जनसंवाद यात्रेचा झंझावात सुरू आहे. नगरदेवळा बाळद जि प गटातील दिघी, बदरखे ,वडगाव ,नेरी, सार्वे, पिंप्री, खाजोळा ,भोरटेक आदी गावांमध्ये जनसंवाद यात्रा पोहोचली. यात दिलीप वाघ यांचे सह संजय वाघ, नितीन तावडे, विकास पाटील ,विलास भामरे, पंकज गढरी, अभिजीत पवार ,युवती अध्यक्ष ॲड अभिलाषा रोकडे, हरीश पाटील, तेजस पाटील, निकिता राजपूत या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत ग्रामस्थांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या जनसंवाद यात्रेस ग्रामस्थांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले.
नगरदेवळा – बाळद जि प गटात जनसंवाद यात्रे प्रसंगी ग्रामस्था समवेत दिलीप वाघ, विकास पाटील, नितीन तावडे, अभिलाषा रोकडे आदि पदाधिकारी.