नगरदेवळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया ग्राहकांना कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे व अरेरवी मुळे नकोशी होत आहे

नगरदेवळा ता.पाचोरा-भारतीय राज्यघटनेत म्हटल्याप्रमाणे देशाच्या सर्व नागरिकांस आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सोप्या व सहज पद्धतीने आर्थिक व्यवहार करता यावेत व देशाच्या शेवटच्या नागरिकास सुद्धा बँकींग च्या मुख्य प्रवाहात येता यावे म्हणून १९ जुलै १९६९ रोजी भारत सरकारने देशातील अनेक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.त्या धोरणानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया नगरदेवळा शाखा ही या परीसरातील एकच जुनी व ग्राहकांची विश्वासपात्र बँक ठरलेली होती.मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागणुकीमुळे व अरेरावी मुळे व सेवा सुविधा देण्यास टाळाटाळ करण्याच्या प्रवृत्तीमुळे ही बँक नकोशी झाली असून अनेक ग्राहक खाते बंद करण्याच्या निर्णयाप्रत आलेले आहेत.येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ही शाखा ग्राहकांच्या नजरेतून उतरत चालली असून सुधारणा न केल्यास बँकेला टाळे ठोकणार असल्याचे निवेदन महिलावर्गाने दिले आहे.मात्र त्यावर देखील संबधितांना फरक पडत नाही तसेच त्यांच्या कामात कुठेही सुधारणा झाली नाही म्हणून लवकरच याबाबत जन आंदोलन करण्यात येणार असल्याचे महिलांनी इशारा दिला आहे.
या बँकेतील प्रिंटर मशीन गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळं पासबुकांत किती रक्कम आहे हे बघता येत नाही, रक्कम काढतांना अडचण येते, अकाऊंट चे आयकर करीता लागणारे मिनी स्टेटमेंट द्यायला कर्मचारी तयार नाहीत, नंतर ग्राहकांना बाहेर खाजगी ठिकाणी पैसे देऊन प्रिंट काढावी लागते, पैसे काढण्याची सोयीची असलेली टोकन पद्धत बंद आहे.त्यामुळे तासन तास उभे राहावे लागते.,जेष्ठ नागरिकांना पैसे टाकणे किवा काढण्यासाठी स्वतंत्र खिडकी नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही., कर्जाच्या फाईली धूळ खात पडून राहत असून लवकर त्याकडे बघितले जात नाही., एटीएम मशीन मध्ये पैसे नसल्याने ते बंदच राहते., महिलांना असभ्य वर्तणूक दिली जात आहे., रोजगार बुडवून दिवसभर गावातील व खेड्यापाड्यातील नागरिक उभे राहतात व कर्मचारी नसल्याचे कारण सांगून त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे याविषयी सर्व सोयीसुविधा ग्राहकांना द्याव्यात व कामाचा भार पडत असेल तर राजीनामे द्यावेत.अन्यथा गावातील नागरिक व महिला बँकेला टाळे ठोकतील यापुर्वी सुध्दा सदरची निवेदन असे ब्रँच मॅनेजर धनंजय रोकडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीयकृत बँका या पब्लिक सेक्टर मध्ये येत असून कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सौजन्याची वागणूक दिली पाहिजे.पण तसे घडत नाही. आपले कुणीच काही बिघडवू शकत नाही या तोऱ्यात कर्मचारी दिसतात. निवेदनावर सौ. अंजली चौहान, भाग्यश्री पाटील, हेमलता महाजन, सरिता निकम, माधुरी महाजन, सविता पवार, अनिता परदेशी, प्रतिभा पाटील, पूनम पाटील,क्रुष्णा मनियार,यश चव्हाण यांच्या सह्या आहेत.