श्री.गो.से.हायस्कूल ,येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

श्री.गो.से.हायस्कूल ,येथे तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

पाचोरा ( प्रतिनिधी)
आज दिनांक 19 ऑक्टोबर बुधवार रोजी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री गो.से.हायस्कूल ,पाचोरा येथे 14 व 17 वर्षाखालील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्ही.टी. जोशी. उद्घाटक दुष्यंत जी रावल तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर नरेश गवांदे व सौ उज्वला महाजन , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ . उप मुख्याध्यापक एन. आर .ठाकरे , पर्यवेक्षक आर .एल. पाटील. तसेच पर्यवेक्षक ए.बी अहिरे सर क्रीडा समन्वयक गिरीश पाटील तसेच सर्व सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे. यांनी केले तसेच प्रास्ताविक शाळेचे उप मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांनी केले तसेच ज्येष्ठ शिक्षक रुपेश पाटील सर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण कुमावत , श्री सुबोध कांतायन , संजय करंदे, महेश चिंचोले , प्रमोद. एम .पाटील , संदीप मनोरे .यांचे सहकार्य लाभले पाचोरा तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कलादालन येथे झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला गेल्या दोन वर्षापासून स्पर्धा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.