भडगावात वैशालीताई सुर्यवंशींचा झंझावाती प्रचार
ठिकठिकाणी स्वागत; नागरिकांनी दिली परिवर्तनाची ग्वाही
भडगाव, दिनांक २८ (प्रतिनिधी ) : शहरातील टोनगाव कॉलनी परिसर व यशवंत नगरात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांनी काढलेल्या प्रचार फेरीला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यंदा परिवर्तन होणारच अशी ग्वाही नागरिकांनी याप्रसंगी दिली.
जोरदार शक्तीप्रदर्शन करत वैशालीताई सुर्यवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वैशालीताई सुर्यवंशी यांची मतदारसंघात प्रचार सुरू केला असून नागरिकांनी याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला आहे. सोमवारी त्यांनी भडगाव शहरातील टोनगाव कॉलनी परिसर आणि सायंकाळी यशवंत कॉलनी या भागात प्रचार केला. याप्रसंगी ठिकठिकाणी त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. बऱ्याच महिलांनी त्यांचे औक्षण केले. तर, तरूणींनी त्यांच्या सोबत सेल्फी घेतले. ताईंनी ज्येष्टांचे आशीर्वाद घेतले. मतदारसंघात समग्र विकासासाठी आपण उमेदवारी करत असून जनतेने आपल्याला साथ द्यावी असे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केले. नागरिकांनी देखील त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
या प्रचार फेरीत गणेश परदेशी, मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, दीपक पाटील, योजना पाटील, पुष्पा परदेशी, जे. के. पाटील, माधव जगताप, चेतन रंगनाथ पाटील, चेतन पाटील, अमोल पाटील, शाम पाटील, उषा परदेशी, यश बिरारी, प्रथमेश गायकवाड, सुशील महाजन, ओमू शिरसे, रितेश महाजन, रोनीत बाविस्कर, पृथ्वीराज पाटील, संकेत सोमवंशी, अनि केत सोमवंशी, नरेंद्र सुर्यवंशी, आदींसह शिवसेना, उध्दव बाळासहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.