पाचोरा युवक मराठा महासंघ तालुका अध्यक्षपदी गणेश शिंदे

पाचोरा युवक मराठा महासंघ तालुका अध्यक्षपदी गणेश शिंदे

पाचोरा– येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक तालुका अध्यक्षपदी गणेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवक जिल्हाध्यक्ष ललित पाटील यांनी ही निवड जाहीर केली.

अ.भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी पाचोरा येथील स्वामी लॉन्स च्या सभागृहात विशेष बैठक संपन्न झाली. या बैठकीला युवक जिल्हाध्यक्ष ललित पाटील, महिला जिल्हा संघटक प्रतिभाताई पवार, महिला जिल्हा सल्लागार अलकनंदाताई भवर, महिला जिल्हा संघटक सोनालीताई पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, युवक जिल्हा संपर्कप्रमुख कमलेश पाटील, चोपडा शहराध्यक्ष अमोल पाटील, चाळीसगावचे शहराध्यक्ष खुशाल बिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

26 रोजी असलेल्या संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन व जिजाऊ वंदनाने बैठकीला सुरुवात झाली. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील शहीद जवान व निष्पाप मृत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत प्रतिभाताई पवार, प्रा. एस. डी. थोरात, अलकनंदाताई भवर, युवक जिल्हाध्यक्ष ललित पाटील, प्रा. शिवाजी शिंदे, यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. देविदास सावळे यांनी सूत्रसंचालन केले तर अक्षय देशमुख यांनी आभार मानले.

या बैठकीत मराठा महासंघाच्या तालुका कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला असून आदर्श उद्योजक तथा अश्विनी ऑटोमोबाईल्स फर्म चे संचालक संजय बापू एरंडे यांची कार्याध्यक्षपदी तर बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांची संघटन सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवक शहराध्यक्ष प्रवीण पाटील, सुनील भोसले, चंद्रकांत पाटील, प्रदीप सोमवंशी, कैलास पाटील, अक्षय देशमुख, प्रेमराज पाटील, महेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

या बैठकीत जाहीर झालेली मराठा महासंघ पाचोरा तालुका युवक कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
गणेश शिंदे -युवक तालुका अध्यक्ष
नंदकुमार शेलकर व ज्ञानेश्वर धोंडू पाटील- उपाध्यक्ष
देविदास सावळे (डोंगरगाव) सरचिटणीस
सचिन पाटील- कार्याध्यक्ष
राकेश जगदेव वाघे (पिंपळगाव हरेश्वर) चिटणीस
विलास रमेश मराठे- खजिनदार
दीपक आनंदा काटे (खेडगाव) संघटक
प्रमोद पाटील (सामनेर) सह संघटक
सचिन अशोक पाटील सहसचिव