_गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाच्या नंदिनी सुर्यवंशी विभागस्तरीय वुशू स्पर्धेत प्रथमस्थानी

_गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाच्या नंदिनी सुर्यवंशी विभागस्तरीय वुशू स्पर्धेत प्रथमस्थानी ….!!!!!!_

भडगाव (वार्ताहर) – *कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव*,संचलीत,*गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव* येथील *कु.नंदिनी लक्ष्मण सुर्यवंशी (- ४८ किलो)* हिने *क्रीडा व युवकसेवा संचलनालय,पुणे* तथा *धुळे जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा संकुल,धुळे* येथे आयोजित १७ वर्षाआतील मुलींच्या *विभागस्तरीय वुशू स्पर्धेत* प्रथमस्थान प्राप्त केले असून तिची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु.नंदिनीस कार्यवाहक *रघुनाथ पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी* यांचे मार्गदर्शन लाभले.
नंदिनीच्या या यशाबद्दल संस्थेचे *चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,उपसचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील*,तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.