औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी तिसऱ्या समुपदेशन फेरीचे आयोजन

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी तिसऱ्या समुपदेशन फेरीचे आयोजन

१ ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश

नाशिक, दि.२ सप्टेंबर,२०२३ विभागातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.तथापी विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच इयत्ता १० वी पुरवणी परीक्षेतील उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरणे, प्रवेश अर्ज निश्चित करणे या करीता तिसऱ्या समुपदेशन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरी तथा ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतात. विभागातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशाचे वेळापत्रक संचालनालयाने admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार संस्थास्तरावरुन प्रवेशाची कार्यवाही दि. १ ते १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत वेळापत्रका प्रमाणे पूर्ण करण्यात येणार आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिकादेखील ऑनलाईन स्वरुपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना एसएमएसव्दारे कळविले जाणार आहे. नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी उमेदवाराने व्यक्तिशः उपस्थित रहावे. उमेदवारांना सर्व मूळ प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.

दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, आयटीआयमधून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरीत रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावेत, असे आवाहन विभागाचे सहाय्यक संचालक बी. जी. जाधव यांनी केले आहे.