चोपडा महाविद्यालयात वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, टेबल टेनिस व बॉडी बिल्डींग स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा महाविद्यालयात वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग, टेबल टेनिस व बॉडी बिल्डींग स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि.१८ ऑक्टोबर, २०२३ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभागाच्या आंतर महाविद्यालयीन टेबल-टेनिस -मुले व मुली, वेटलिफ्टिंग – मुले व मुली, पावर लिफ्टींग- मुले व मुली आणि बॉडीबिल्डिंग- मुले इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांसाठी संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी एरंडोल विभाग क्रीडा समितीचे सचिव व पंकज महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, अभियांत्रिकी महाविद्यालय भांबोरीचे क्रीडा संचालक प्रा.जे.बी.सिसोदिया, एस.एस.पाटील बी.फार्मसी चोपडा महाविद्यालयाचे प्रा.रोहित चौधरी, पाळधी येथील त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. भूषण पाटील इ. मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा. एम.जी.पाटील, प्रा.डॉ. के. एन सोनवणे, डॉ. सी.आर.देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
या टेबल- टेनिस स्पर्धेमध्ये चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयाचे मुले आणि मुली हे दोन्ही संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाले. वांभोरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मुले आणि मुली दोन्ही संघ उपविजयी झाले तसेच यावेळी वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंग या स्पर्धांचे ही यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विविध वजन गटांमध्ये दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयाचे पॉवर लिफ्टिंग व वेटलिफ्टींग असे दोन्ही संघ विजयी झाले तर भडंग येथील सौ.र.ना. देशमुख महाविद्यालयाचे दोन्हीं संघ उपविजयी झाले.
या स्पर्धांसाठी पंच म्हणून कुणाल गोयर, किशोर महाजन तसेच बॉडीबिल्डिंग या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुधाकर बाविस्कर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी आर.एच.पाटील, सुधाकर बाविस्कर, विजय शुक्ल यांनी परिश्रम घेतले.