पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस एस एम एम महाविद्यालयात जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न
दिनांक 17, 18 ,19 ऑक्टोबर2025 अशा तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या सदर स्पर्धा या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस एस एम एम महाविद्यालय पाचोरा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते
याबाबत अधिक असे की जिल्हा भरात सुरू असलेल्या शासकीय शालेय स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि त्यातीलच जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान हा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस एस एम एम महाविद्यालय पाचोरा यांना मिळाला दिनांक 17 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे उद्घाटन चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ , व्हा चेअरमन नानासो व्ही टी जोशी संचालक आप्पासो सतीश चौधरी , प्राचार्य डॉ शिरीष पाटील , उप प्राचार्य डॉ वासुदेव वले ,उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील , कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा एस एस पाटील पर्यवेक्षक डॉ प्रा जे पी बडगुजर , माध्यमिक पतपेढीचे सचिव श्री भावेश अहिरराव सर , तालुका क्रीडा समनव्यक व क्रीडा शिक्षक प्रा गिरीष पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात केली सदर स्पर्धेत जवळजवळ 150 शाळा व 100 महाविद्यालय यातील एकूण 900 मुले व 700 मुली खेळाडूंनी सहभाग नोंदवीला सदर स्पर्धेत जिल्हा भरातील शाळांनी उत्कृष्ट प्रतिसाद नोंदविला सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंच म्हणून जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे तांत्रिक समिती प्रमुख श्री जी सी पाटील सर( जामनेर ), श्री राहुल साळुंखे (चाळीसगाव), श्री गणेश एन पाटील सर , श्री एस के पाटील सर , प्रा वाल्मीक पाटील , श्री सुभाष राठोड सर , प्रा प्रशांत शिरोडे , अझर खान सर, सादिक शेख सर , श्री नितीन पाटील सर, श्री गजानन ठाकूर सर, श्री राजपूत सर, श्री स्वप्नील बागुल सर, श्री राहुल तांबे सर, श्री गणेश मोरे सर,श्री अमोल धनगर सर (सर्व पंच पाचोरा तालुका) श्री रवींद्र महाजन व श्री प्रेमचंद चौधरी (भाडगाव) श्री नरेंद्र महाजन (चोपडा) श्री ललित सोनवणे(चोपडा) प्रा ऋतुजा जोशी व इतर क्रीडा शिक्षक व महाविद्यालयाचे खेळाडू यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील खेळाडू यांनीही मदत केली . व स्पर्धा सर्व शांततेत पार पाडल्या. *तसेच निवृत्ती क्रीडा शिक्षक श्री बी के पाटील व श्री संजय दत्तू सर यांना क्रीडा महासंघाकडून सन्मानित केले* तसेच *श्री भावेश अहिरराव सर याच्या कडून क्रीडा महासंघ सभासद यांना ट्रॅक सूट व लोहार स्पोर्ट्स जळगाव यांच्या कडून सर्व पंचांना टीशर्ट देण्यात आले* तसेच या तीन दिवशीय मैदानी स्पर्धेत श्री जगदीश चौधरी (तालुका क्रीडा अधिकारी ) राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी श्री. किशोर चौधरी, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.इकबाल मिर्झा, सचिन महाजन, निलेश पाटील, प्रा. हरीश शेळके, जितेंद्र शिंदे, विजय विसपुते , *एम.एम.कॉलेजचे माजी क्रीडा संचालक आदरणीय गुरुवर्य प्रा.मालोजीराव भोसले व एम.एम.ज्युनियर कॉलेजचे माजी क्रीडा संचालक आदरणीय गुरुवर्य प्रा.वाय ओ पाटील* यांनी भेट दिली तसेच मुख्याध्यापिका उज्वला देशमुख म्याडम ( कन्या माध्य व उच्च माध्य शाळा पाचोरा , न्यू बुरहानी इंग्लिश मेडिअम स्कुलचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर देवरे , प्रा मनोज पाटील (तालुका क्रीडा समन्वयक एरंडोल) , श्री सचिन सूर्यवंशी( तालुका क्रीडा समन्वयक धरणगाव) श्री अजय देशमुख ( तालुका क्रीडा समन्वयक चाळीसगाव ) श्री संजीव वाधे ( तालुका क्रीडा समन्वयक मुक्ताईनगर) श्री राजेंद्र अल्हाट (तालुका क्रीडा समन्वयक चोपडा) श्री दिलीप संगीले( तालुका क्रीडा समन्वयक यावल ), डॉ सचिन भोसले ( तालुका क्रीडा समन्वयक भाडगाव )या मान्यवरांनी भेट दिली. श्री सुभाष राठोड सर यांनी सुत्रसंचलन केले व प्रा गिरीष पाटील यांनी आभार मानले.