भडगांव दिव्यांगांचे तहसीलदार मुकेश हिवाळे व पो. स्टे. दक्षता अध्यक्षा योजना पाटील सोडविले उपोषण

भडगांव दिव्यांगांचे तहसीलदार मुकेश हिवाळे व पो. स्टे. दक्षता अध्यक्षा योजना पाटील सोडविले उपोषण…

भडगांव (प्रतिनिधी) : आज दि.13 सप्टेंबर 2022 रोजी भडगांव तालुका दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांगांना साहित्य त्वरित मिळावे यासाठी दिव्यांग बंधू भगिनी तहसील आवारात उपोषणास बसले होते. तहसीलदार मुकेश हिवाळे व पो. स्टे. दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांनी सदर उपोषनार्थीची भेट घेतली. मागणीबाबत माहिती घेतली असता आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दि.13 सप्टेंबर 2021 रोजी भडगांव येथे दिव्यांग तपासणी शिबीर घेतले होते. परंतु त्यांना अद्याप साहित्य मिळाले नाही. स्वीय सहाय्यक राजीव पाटील सांगितले की, शासनाकडे पाठपुरावा केला आहे. काही साहित्यही उपलब्ध झाले आहे. लवकरच साहित्य वाटप होईल. याबाबतचे माहिती पत्र तहसीलदार मुकेश हिवाळे व दक्षता अध्यक्षा योजना पाटील यांनी अध्यक्ष भरत धोबी व सरचिटणीस संजय सोनवणे यांना दिले व लिंबू पाणी सरबत देऊन उपोषण सोडविले.