Home महाराष्ट्र गलवाडा येथे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन

गलवाडा येथे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन

गलवाडा येथे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन

 

 

 

 

दत्तात्रय काटोले

सोयगाव (प्रतिनिधी) — गलवाडा येथे महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सरपंच फिरोज पठाण व उपसरपंच मंगलाबाई बिऱ्हारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छायाचित्र ओळ : गलवाडा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना मान्यवर.

 

कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी बाबासाहेबांच्या फोटोसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून दोन मिनिटे मौन पाळले. भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेण्यात आला. समाजातील समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना पुढे नेण्याचे आवाहनही करण्यात आले.

 

कार्यक्रमास सुशीलाबाई इंगळे, भगवान तायडे, ग्रामविकास अधिकारी सत्यनारायण पुल्लेवाड, अनिल इंगळे, सुनील सैदाणे, पोलीस पाटील मिलिंद सोनवणे, संतोष बिऱ्हारे, बळीराम सुरडकर, आकाश इंगळे, रवींद्र मंडवे, दिनेश माजाटे, राहुल इंगळे, साहेबराव बिऱ्हारे, भास्कर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

महामानवांच्या कार्याचा ध्यास घेऊन समाजात समानता, शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश व्यापक करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गलवाडा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Don`t copy text!