बकाले वर कठोर कारवाई होणारच :अजितदादा पवार

बकाले वर कठोर कारवाई होणारच :अजितदादा पवार

पाचोरा (प्रतिनिधी) – मराठा समाजा बद्द्ल अपशब्द वापरणार्या पोलीस निरीक्षक बकाले वर बडतर्फ ची कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल मराठा समाज मराठा क्रांति मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली

पाचोरा दौर्‍यावर असलेले अजीतदादा पवार यांना एलसीबी पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजा बद्द्ल अपशब्द वापरणार्या बाबत निलंबित कारवाई नंतर चौकशी करून सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी अखिल मराठा समाज, मराठा क्रांति मोर्चा, सकल मराठा समाजाच्या, वतीने निवेदन देण्यात तसेच म आले यावेळी ना. अजितदादा पवार यांनी कठोर कारवाई केली जाईल याचे आश्वासन मराठा समाज अध्यक्ष डॉ योगेश पाटील,सचिव संजय पाटील मराठा क्रांति मोर्चा सकल मराठा समाजाचे समन्वयक सचिन सोमवंशी यांना दिले. तसेच मराठा क्रांति मोर्चाचे यावेळी एक मराठा लाख मराठा.. बकाले बडतर्फ झालेच पाहिजे.. जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी कॉलेज चौक दणाणला.. राकेश सोनवणे, नितीन पाटील,धनराज पाटील,गणेश पाटील, लकी पाटील, सचिन पाटील, राहुल केतन पाटील आबाजी पाटील शिंदे,एस ,ए,पाटील दिगंबर पाटील, किशोर गोकुळ पाटील, पाटील,कल्पशे येवले, आदी उपस्थित होते.