जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहाडी ता.पाचोरा येथे स्वातंत्र्याचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला

दि.१५/८/२०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहाडी ता.पाचोरा येथे स्वातंत्र्याचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

आज पर्यंतच्या इतिहासात असा उपक्रम शाळेत कधिही साजरा झालेला नसून असा सुंदर कार्यक्रम शाळेत साजरा करण्यात आला.ध्वजारोहण व सेवापुर्तिचा सत्काराचा कार्यक्रम भव्यदिव्य मिरवणूक काढुन ढोल ताशाच्या गजरात संपन्न झाल.कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन.मोहाडीचे सरपंच ज्योतीताई हेमराज पाटील ह्या होत्या व प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित पाचोरा येथिल शाहीर श्री.विठ्ठल एकनाथ महाजन माऊली.यांनी देशभक्ती पर गीत सादर करून मनोगत व्यक्त केले तसेच मोहाडी गावाचे सुपुत्र श्री शिवाजी देवचंद महाजन यांचे सुपुत्र श्री सुनिल शिवाजी महाजन साहेब हे नुकतेच सेवादलातुन नायक पदावरुन सेवा निवृत्त झाले असून त्यांनी आमच्या शाळेतील सर्व ६५ विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस वाटप करून शाळेला सहकार्य केले.असे एक दोन नव्हे तर सौजन्य धारक दहा दाते आज आम्हाला लाभलेले आहेत या सर्वांनी यथाशक्ती सौजन्याच्या माध्यमातून उदार मनाने सहकार्य केले.तसेच शालेय कंपाऊंड गेट व कलर पेंटिंग डाॅ.श्री.किसन हरी चव्हाण सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला किट- श्री.निलेश अशोक महाजन वह्या
श्री.कल्पेश साहेबराव महाजन,
अंकलिपी उजळणी -श्री गोरख रंगनाथ गोपाळ
पेन-श्री प्रकाश मोतीराम नाईक व श्री.दयाराम राघो पाटील,घड्याळ-श्री.महेंद्र धर्मराज महाजन,म.गांधींचा फोटो
श्री.जोरसिंग देशमुख जाधव
आणि साउंड सिस्टिमचा खर्च-श्री.चंद्रकांत निंबा महाजन अशी भेट वस्तुस्वरुपात चाळीस हजारांची व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बक्षिस रुपात रोख रक्कम पाचहजारांची मदत आज शाळेला करण्यात आली.वरील सर्व दात्यांचे मनापासुन आभार.त्याच प्रमाणे आम्हाला कार्यक्रमात सहकार्य केल्याबद्दल आभार सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे,श्री.हेमराज दादा पाटील,उपसरपंच – श्री लोटन दादा महाजन ,
सर्व ग्राम पंचायत सदस्यांचे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.जोरसिंग दादा जाधव, गावाचे पोलिस पाटील श्री.विजय दादा पवार ग्रामसेक आप्पा,गावातील बंजारा ब्रिगेड जळगाव जिल्हा युवाअध्यक्ष श्री.योगेश जाधव उपस्थित सर्व माता पालक,पुरुष पालक,सर्व ग्रामस्थ,माता बघिनी,मोहाडी गावातील सर्व तरुण मित्र मंडळ आमचे बालगोपाल विद्यार्थी
आणि विशेष आभार गेल्या महीनाभरा पासुन या कार्यक्रमाच्या नियोजनात स्वतःला झोकुन देणारे आमचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.किसन सोमा जाधव व श्री.अनिलभाऊ शिवाजी महाजन आणि शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद.आपल्या सर्वांचे सदैव असेच सहकार्य मिळावे हीच विनंती.माजी सैनिक हे अनिल शिवाजी महाजन बागुल यांचे लहान बंधू आहेत.कार्यक्रमाचे आयोजक जि.प.शाळेचे शिक्षक स्टाफ व मोहाडी ग्रामस्थ तालुका पाचोरा जिल्हा जळगाव.