अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा पदाधिकार्‍यांची पुरवठा विभागास भेट

अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा पदाधिकार्‍यांची पुरवठा विभागास भेट

अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्ल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांनी तालुका पुरवठा अधिकारी पूनम थोरात यांचेशी भ्रमणध्वनी वर ग्राहक तक्रारी बाबत संपर्क साधला व श्री शरद गीते तालुका संघटक यांचे शिष्टमंडळाला तक्रारींची दखल घेत त्वरित न्याय देणे सांबांधी विनीत केले.
पाचोरा येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतिचे तालुका संघटक शरद गीते सर यांनी पुरवठा अधिकारी कुमारी पुनम थोरात यांच्याशी पुरवठा विभागातील बऱ्याच तक्रारी संदर्भात चर्चा केली , प्रामुख्याने रेशन कार्ड चे नाव ऑनलाईन करणे,रेशन कार्ड नवीन, फाटलेली रेशन कार्ड यासंदर्भात , धान्य न मिळणे,
तसेच सर्वज्ञ महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सर्व बचत गट महिला यांच्याही तक्रारीसंदर्भात चर्चा झाली ,तालुका पुरवठा अधिकारी पूनम थोरात पाचोरा यांनी या तक्रारींवर दखल घेत त्वरित कारवाई होऊन त्या सोडवल्या जातील असे आश्वासन अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका संघटक श्री शरद गीते यांचे सहित आलेल्या ग्राहक शिष्टमंडळाला दिले.