दु:खद बातमी- सर्पदंशाने कृष्णापूरी भागातील वाल्मिक पाडूरंग महाजन यांचे निधन

दु:खद बातमी- सर्पदंशाने कृष्णापूरी भागातील वाल्मिक पाडूरंग महाजन यांचे निधन

पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील रहिवास वाल्मिक महाजन वय ५८ यांचे आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने दुःखद निधन झाले.ते नेहमी प्रमाणे सायंकाळी शेतात जाऊन गुरांना चारापाणी करुन व दुध काढून घरी येत असतांना त्यांना सर्पदंश झाला . त्याना तात्काळ पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दखल केले असता वैद्यकीय आधिकारी डॉ.आमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावाई नातवडे असा परिवार आहे. भारतीय सैन्य दलातील स्वप्निल महाजन यांचे वडील होते तरी त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९ वाजता कृष्णापुरी येथून निघणार आहे.