पि.टी.सी संस्था मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे नगरदेवळा मुस्लिम सोसायटी तर्फे सत्कार

पि.टी.सी संस्था मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे नगरदेवळा मुस्लिम सोसायटी तर्फे सत्कार

पाचोरा व भडगाव तालुक्यातील ज्ञानगंगा म्हणून नाव रूपाला आलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतेच झाली. ही निवडणूक संस्थेच्या चेअरमन,नामद सचिव,संचालक मंडळ,अशा 34 जागांसाठी होती. यातून नगरदेवळा गावातील एस.एस.के.पवार हायस्कूलचे चेअरमन शिवनारायन जाधव व राकेश बाबा ठेपडे यांची पि.टी.सी संचालक मंडळ मध्ये बिनविरोध निवड झाली आहे. याअनुषंगाने नगरदेवळा मुस्लिम विविध कार्यकारी सेवा सोसायटी कडून त्यांच्या सत्कार साठी एका कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आला.यावेळी नगरदेवळा मुस्लिम सोसायटीचे चेअरमन अब्दुल गनी शेख कमरोददीन व संचालक अन्सार शेख(अन्नू मेंबर)यांच्या हस्ते पुष्प व शाल देऊन मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी मुस्लिम सोसायटीचे व्हाईस चेअरमन हबीब खान,संचालक मंडळ मधून अन्सार शेख , सादिक अली, सिकंदर पिंजारी, हकीम आजम, उमर बेग, गुलाम गोस बागवान, सईद बेग, फरीद पठाण, अली रजा खान उपस्थित होते.