शिवजयंती निमित्त कुरंगी येथील निराधार वृद्धाश्रमास मदत

शिवजयंती निमित्त कुरंगी येथील निराधार वृद्धाश्रमास मदत

नांद्रा (ता.पाचोरा)ता.२२ महाराष्ट्रासह संपूर्ण देशात नव्हे तर जगात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली.शिवभक्त आपल्यापरीने शिवजयंती साजरी करत असतो. शिवभक्तांसाठी शिवजयंती म्हणजे जणू एक उत्सवच असेच आगळेवेगळे शिवभक्त भास्करराव राजाराम तुपे सर यांनी शिवजयंतीनिमित्त शोभाई निराधार वृध्दाश्रम कुरंगी तालुका पाचोरा येथे बांधकामास तीन हजार रु ची मदत दिली. धर्मराज फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार सर व सचिव शिवव्याख्याते डॉ संतोष पाटील गोराडखेडेकर यांनी निराधार वृद्धाश्रमाची सुरूवात केली. स्वखर्चाने कामाला सुरूवात झालेली पाहून तुपे सर हे संजय पवार यांचे गुरू आहेत.शिष्याचे चांगले काम पाहून गुरूने शिष्यास कौतुकाची थाप दिली व बांधकामास तीन हजार रुपयांची मदत केली. छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य बहुजन समाजाच्या उत्थानासाठी , मदतीसाठीच ,उत्कर्षासाठी निर्माण केले व तुपे सरांनी सामाजिक कार्यास मदत करून खरी शिवजयंती साजरी केली असे असे मत संस्थेचे सचिव व्याख्याते डॉ संतोष पाटील यांनी व्यक्त केले .या वेळेस शोभाई निराधार वृद्धाश्रमाचे अध्यक्ष संजय पवार सर,उपाध्यक्ष डॉ सूर्यकांत पवार , सदस्य डॉ दीपक पवार , डॉ नीलेश पवार उपस्थित होते व त्यांनी सरांचे आभार मानले. कुरंगी (ता..पाचोरा) येथील धर्मराज फाउंडेशनच्या अध्यक्षा संजय पवार यांच्या कडे वुद्ध आश्रमाच्या बांधकामासाठी तीन हजारांचा निधी देतांना भास्कर राव तुपे आदी.