श्री. गो.से से हायस्कूलची विद्यार्थिनी तेजस्विनी सावंत शासकीय गुणवत्ता यादीत पात्र
पाचोरा ( प्रतिनिधी)
इयत्ता पाचवी ची कुमारी तेजोनिधी शिवाजी सावंत विद्यार्थिनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आली असून ती शासकीय शिष्यवृत्ती पात्र ठरली आहे. तिचे मुख्याध्यापक श्री एन. आर. पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री आर. एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल मॅडम, पर्यवेक्षक श्री रहीम तडवी सर ,श्रीआर बी बांठिया सर ज्येष्ठ शिक्षक श्री पी एम पाटील सर तसेच श्री सागर पाटील सर आणि श्री मयुरेश देवरे सर यांनी अभिनंदन केले. सोबत तिचे पालक श्री शिवाजी सावंत,
आईचे सौ.वृषाली सावंत. उपस्थित होते. तिला शिक्षक श्री.विजय पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.

























