सु.भा.पाटील प्रा.विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक श्री परदेशी सर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक-पालक सभा

सु.भा.पाटील प्रा.विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक श्री परदेशी सर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक -पालक सभा

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्रा.विद्यामंदिर येथे आज दि.1३/९/२०२३ बुधवार रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री परदेशी सर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक -पालक सभा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी हजेरी,शालेय शिस्त,शालेय पोषण आहाराचे महत्त्व, विद्यार्थ्यांचा सहशालेय उपक्रमातील सहभाग ,विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास, बाल हक्क व लैंगिक शोषण, विद्यार्थ्यांची मानसिकता इ…अनेक विषयांवर यावेळी चर्चासत्र घेण्यात आले.* यावेळी शाळेतील पालक श्री किशोर नरेराव,सौ मयुरी पेंढारकर, पूजा गाडेकर इ.पालकांनी आपल्या शाळेविषयी च्या सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील जेष्ठ शिक्षिका श्रीमती उज्वला साळुंके मॅडम यांनी केले.बाल हक्क व लैंगिक शोषण,पोक्सो कायदा,विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्याची गरज इ… याविषयी विषय विवेचन तथा प्रोजेक्टर द्वारा स्पष्टीकरण श्री मनोज पवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा पाटील मॅडम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमाचे प्रोजेक्टर द्वारे चित्रीकरण करण्यासाठी श्री रवींद्र महाले सर यांनी अनमोल सहकार्य केले.
सर्व उपस्थितांचे आभार श्री महाले सर यांनी व्यक्त केले. या प्रसंगी टिपलेले क्षणचित्रे