चोपडा महाविद्यालयात जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘चिऊताई तुझ्यासाठी काही पण–!’ कार्यक्रम साजरा

चोपडा महाविद्यालयात जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘चिऊताई तुझ्यासाठी काही पण–!’ कार्यक्रम साजरा

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘जागतिक चिमणी दिनानिमित्त’ ‘चिऊताई तुझ्यासाठी काही पण-!’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवरांना परिसरातील फुलांचे गुच्छ व चिमण्यांना कडधान्य व पाणी ठेवण्यासाठी लागणारे छोटे पात्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तसेच प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.हनुमंत गोपाळराव सदाफुले, उपप्राचार्य प्रा .डॉ. ए .एल. चौधरी, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.एम.बागुल, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रतीक पाटील, डॉ.सौदागर, प्रा.पटेल, पूजा पाटील, जागृती सूर्यवंशी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूञसंचलन प्रा.स्नेहल शिंदे यांनी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हनुमंत गोपाळ सदाफुले चिमणीबद्दल आपले मत मांडताना म्हणाले की, दि.२० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस (वर्ल्ड स्पॅरो डे) म्हणून साजरा केला जातो. कुठे तरी प्रत्येकाचे बालपण चिऊताई च्या आठवणींशी जोडले गेले आहे. अनेकांचे जेवण चिऊताईच्या घासानेच सुरू झाले. चिमणीचे अस्तित्व दुर्मिळ होत चालले असून वाढते शहरीकरण, प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशकांचा बेसुमार वापर, मोबाईल टॉवर्स, घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता चिमण्यांची संख्या कमी होते आहे.यामुळे अन्नसाखळी धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. याच कारणामुळे चिमण्यांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या संख्येबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी कारण चिमण्यांची घटती संख्या मानवासाठी अधिक धोकादायक आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए .एल.चौधरी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, चिमणी वाचविण्यासाठी घराजवळ, गच्चीवर धान्य, पाणी ठेवावे त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढून पुन्हा त्यांचा चिवचिवाट ऐकून आजची मुले आणखी निसर्गाजवळ जातील, त्यांचा ताण नक्कीच कमी होईल, असा विश्वासही यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमानिमित्त बेस्ट प्रॅक्टिस म्हणून आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते व काही विद्यार्थ्यांच्या हस्ते चिमण्यांना दाणापाणी देण्यासाठी मातीचे भांडे घेऊन त्यामध्ये चारा म्हणून वेगवेगळे धान्य पाणी वेगवेगळ्या पात्रांमध्ये व वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून जणू काही चिमण्यांना आमंत्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक व इतर सर्व प्रेक्षकांना चिमणी दिवसानिमित्त डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात आली.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, चिमणी जी अंगणात, घरात, जेवणाच्या ताटाजवळ दिसणारी, माणसांवर प्रेम करणारी चिमणी हद्दपार होत आहे.तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे’.
या कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.स्नेहल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.अदिती मोरे यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र या विभागातील सर्व प्राध्यापक, सर्व विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.