विविध मागण्या संदर्भात पाचोरा न. पा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले 

विविध मागण्या संदर्भात पाचोरा न. पा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले

 

 

वरील विषयांव्ये आम्ही खालील स्वाक्षरी करणारे सर्व नागरिक गाडगे बाबा नगर, भास्कर नगर , योगेश्वर नगर, लक्ष्मी अंगण लक्ष्मी पार्क, शंकर नगर, कृष्णा रेसिडेन्सी शाहू नगर, अमृत नगर, अंतुरली रोड वरील भाग या परिसरातील वास्तव्यात असून या सर्व भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम मागील काही वर्षापासून अपूर्ण स्थितीत असून सक्रिय महामार्ग क्रमांक 755 अ पासून सुरू होणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काही भाग स्वरुपदर्शन ब्युटी पार्लर पासून ते चिंचेच्या झाडा पावितो अपूर्ण असून वरील सर्व भागातील नागरिकांना मोठा अडचणीला सामोरे जावे लागत आहे सध्याची स्थिती पावसाची असून येथे मोठ्या प्रमाणात चिखल व खड्डे पडल्याने व पाणी साचल्याने अपघात होऊन नागरिकांना दुखापत होत.आहे तसेच याबाबत आपणाकडे दिनांक १३/०९/२०२२ रोजी लेखी स्वरुपात तक्रार दिली असून तसेच दिनांक २२/११/२०२२ रोजी स्मरणपत्र सुद्धा दिले तसेच ०४/१०/२०२३ रोजी तसेच वेळोवेळी निवेदन दिले तरी देखील या रस्त्याचे बांधकाम सुरू करुन अपूर्ण अवस्थेत बंद पडल्यामुळे या परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रमाणात रोश निर्माण झाला असून तरी येत्या १५ दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आम्ही सर्व नागरिक या संदर्भात सामूहिक पद्धतीने आंदोलन करू यासाठी होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार न पा प्रशासन राहील याची नोंद घ्यावी.

 

आपले स्नेहांकित