नांद्रा ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य सैनिक यांच्या प्रतिमेंच पूजन व स्थापना

नांद्रा ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्य सैनिक यांच्या प्रतिमेंच पूजन व स्थापना

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी)  येथे सन 1942 च्या भारत छोडो व चले जाव चळवळ या महात्मा गांधीजींच्या चळवळीमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या घरादाराचा त्याग करून, तुरुंगवास भोगून ज्या महान देशभक्तांनी अशा क्रांतिकारी चळवळीत सहभाग घेतला होता त्यामधील नांद्रा येथीलही तीन थोर स्वातंत्र्य सेनानी नांद्रा येथील भूमिपुत्र यांचाही समावेश होता यामध्ये यामध्ये स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी लोटन सोनजी सूर्यवंशी स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी माधवराव लाला सूर्यवंशी व स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी कपूरचंदजी मुथा यांचा समावेश होता याच अनुषंगाने नांद्रा येथील ग्रामस्थ व या स्वातंत्र्य सेनानी कुटुंबातील सूर्यवंशी व मुथा परिवार कुटुंबातील यांनी या तिन्ही स्वातंत्र्य सेनानी यांचा जाहीर प्रतिमेचे पूजन माल्या अर्पण महादेव मंदिर चौक यामध्ये नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त करण्यात आले व त्यानंतर सवाद्य त्या प्रतिमेचे ग्राम पंचायत सचिवालय नांद्रा या ठिकाणी सरपंच पुत्र विनोद तावडे उपसरपंच शिवाजी तावडे व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून प्रतिमा स्थापना करण्यात आल्या याप्रसंगी सूत्रसंचालन बंटी दादा सूर्यवंशी व याप्रसंगी स्वातंत्र्य संग्रामातील आठवणींना उजाळा आपल्या मनोगतातून विश्वनाथ लोटन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, मुंबई फायर ब्रिगेड कर्मचारी मेघराज दादा सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ सूर्यवंशी यांनी दिला याप्रसंगी सरपंच, ग्रामपंचायत कमिटी नांद्रा, गावातील समस्त ग्रामस्थ,आजी-माजी सैनिक,समस्त माता-भगिनी, सूर्यवंशी व मुथा परिवार व परिसरातील मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते