गिरड वि.का.सो.निवडणूकीत सहकार पॅनलचा दबदबा

गिरड वि.का.सो.निवडणूकीत सहकार पॅनलचा दबदबा.

नांद्रा(ता.पाचोरा)ता.16 संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या गिरड वि.का.सो.च्या चुरशीच्या लढती नंतर माजी जि.प.सदस्य, माजी वि.का.सो.चेअरमन पुरस्कूत परिवर्तन पॅनल ला पराभूत करत सहकार पॅनलने आण्णासाहेब मोहन अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपलं वर्चस्व कायम ठेवले.गिरड सोसायटी च्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा निवडीचा कार्यक्रम माजी पंचायत सभापती भडगाव मोहन अर्जुन पाटील यांच्या उपस्थितीत चेअरमन पदी डॉ.प्रदीप कुमार बाहेती तर व्हाईस चेअरमन पदी सौ.संध्या पाटील यांची बिनविरोध निवड करुण सहकारात नवीन आदर्श निर्माण केला आहे.तसेच या वि.का.सो मधे गेल्या पंचवीस वर्षांपासून मोहन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व असुन एकीकडे सहकारात संस्था डबघाईस जात असताना च्या काळात गिरड सोसायटी च्या पारदर्शक कारभारामुळे या सोसायटी ने जिल्हात वेगळे स्थान निर्माण केलं आहे.या निवडी प्रसंगी मोहन पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाॅ.चेअरमन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी नवनिर्वाचित सदस्य प्रल्हाद पाटील, हिराबाई पाटील, मोहन पाटील आनंदा कोळी, सुभाष पाटील, कैलास धनगर, अनिल पाटील, प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील, दिपक सोनवणे, निवडणुक निर्णय अधिकारी श्री वळवी साहेब संस्थेचे सचिव प्रशांत पाटील व कर्मचारी वृंद अपस्थीत होते.