जखमींना रुग्णालयात दाखल करुन दाखविली माणुसकी

जखमींना रुग्णालयात दाखल करुन दाखविली माणुसकी….

जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

जळगाव प्रतिनिधी = पाचोरा तालुक्यातील निंभोरी ते तांडा जवळील वळणावर मोटार सायकलला कुञा आडवा गेल्याने अपघात झाल्याचे दिसल्यानंतर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे यांनी आपले चारचाकी वाहन बाजूला घेतले. स्वत:च्या वाहनातून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या वयवृध्द महिला यांना क्षणांचाही विलंब न करता तात्कळ पाचोरा येथे त्वरित उपचारासाठी पाठविले. त्यांच्या या दाखविलेल्या माणुसकीचें सर्वत्र कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे कि पाचोरा तालुक्यातील निंभोरी ते तांडा दरम्यान पाचोऱ्याकडे मोटार सायकलवर जाणाऱ्या चंदन पारोचे व त्यांची वयोवृद्ध आई हे मोटार सायकलीने जात असतांना त्यांची गाडीला अचानक कुत्रा आडवा गेल्याने त्यांची गाडी स्लीप झाली असता मोटार सायकल ही रस्त्याच्या बाजूला फेकली गेली होती त्यात मोटार सायकलीवर मागे बसलेल्या वयोवृद्ध आई यांना जबरदस्त मार लागला व त्या जागेवर बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावरच पडलेल्या अवस्थेत दिसुन आल्या होत्या. याच वेळी शिंदाड येथे कार्यक्रमानिमित्त जात असलेले शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे यांनी तात्काळ अपघातातील जखमींना आपल्या स्वताच्या चार चाकी गाडी मध्ये टाकुन त्यांना उपचारासाठी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करुन माणुसकीचें दर्शन घडविल्याने या कार्याचे कौतुक होत आहे.या वेळी जखमींना उपचारासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस जितेंद्र पाटील हे देखील मदतीला धावून आले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य उध्दव मराठे हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी पाचोऱ्याहुन शिंदाड येथे जाण्यासाठी निघाले होते. पण अपघात झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी आपले चारचाकी वाहन बाजूला घेतले. स्वत:च्या वाहनातून जखमी उपचारासाठी पाचोरा येथे पाठविले.त्यानी जखमींना उपचारासाठी मदत करुन दाखविलेल्या माणुसकीचें सर्वत्र कौतुक होत आहे.