राज्यात माळी समाज महामंडळाची स्थापना श्री.अनिल महाजन यांची अध्यक्षपदी निवड

राज्यात माळी समाज महामंडळाची स्थापना
माळी समाज महामंडळाच्या अध्यक्षपदी ओबीसी नेते, माळी समाजाचा बुलंद आवाज श्री.अनिल महाजन यांची अध्यक्षपदी निवड.
राज्यात प्रत्येक मतदारसंघात माळी समाज बहुमूल्य आहे. राज्यात क्रमांक दोनचा समाज म्हणून माळी समाज हा गणला जातो. प्रत्येक मतदार संघात निर्णायक कारक लोकसंख्या ही माळी समाजाची आहे. ओबीसी मध्ये सर्वात मोठा समाज हा माळी समाज आहे. राज्यात प्रथमच माळी समाज महामंडळाची स्थापना करण्यात आली. समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विद्यार्थ्यांच्या कौशल्यासाठी, समाजातील तरुणांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी माळी समाज महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जाणार आहेत.
माळी समाजासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी अहोरात्र झटणारे खान्देश पुत्र व ह.मु. मुंबई येथील रहिवासी ओबीसी नेते अनिलभाऊ महाजन यांची माळी समाज महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तसेच या माळी समाज महामंडळाच्या सदस्यपदी धुळे येथील आर.बी.माळी, नवी मुंबई – नेरुळ येथील हरिश्चंद्र डोके व पालघर – बोईसर येथील प्रवीण महाजन या प्रमुख तीन सदस्यांची पहिल्या टप्प्यात वर्णी लागली आहे. यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या महामंडळाचे अध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांच्या शिफारशीनुसार अजून यामध्ये काही सदस्याची वाढ होणार आहे. समाजाचे काम करताना चांगल्या कामाची पावती एक ना एक दिवस मिळत असते. राज्यपातळीवर माळी समाजाचा बुलंद आवाज म्हणून अनिलभाऊ महाजन आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या माळी महामंडळाच्या माध्यमातून लढा देणार आहेत. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यात माळी समाज महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.
समाजातून सर्व स्तरातून ओबीसी नेते अध्यक्ष अनिलभाऊ महाजन व नवनियुक्त सदस्य यांचे अभिनंदन होत आहे.
आपला स्नेहांकित.