चोपडा महाविद्यालयाने अनाथालयातील बालक व महिलांच्या उपस्थितीत साजरा केला ‘जागतिक महिला दिवस’

चोपडा महाविद्यालयाने अनाथालयातील बालक व महिलांच्या उपस्थितीत साजरा केला ‘जागतिक महिला दिवस’

चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील युवतीसभेअंतर्गत ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ‘महिला सक्षमीकरण’, ‘स्री शक्तिचा जागर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करून तसेच सामाजिक, राजकीय, आरोग्य या विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या महिलांचा गौरव करून हा दिवस साजरा करण्यात येतो.
संस्थेचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ‘आपण समाजाचे देणे लागतो व समाजासाठी आपल्या महाविद्यालयातर्फे जे करता येईल ते चांगले कार्य केले पाहिजे’. याच विचारातून प्रेरणा घेऊन यावर्षी युवतीसभेअंतर्गत अमर संस्था चोपडा, संचलित वेले येथील बालकाश्रम व वृद्धाश्रम याठिकाणी अनाथ बालक व अनाथ महिला यांच्यासोबत वेळ व्यथित करून व त्यांना मिष्ठान्न भोजन देऊन ‘जागतिक महिला दिवस’ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील या उपस्थित होत्या. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी तेथील बालकांची, वृद्ध महिलांची भेट घेउन आणि बुके देवून त्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी युवती सभा प्रमुख डॉ.सौ.प्रिती रावतोळे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले तर सौ. क्रांती क्षीरसागर यांनी आभार मानले.
याप्रसंगी सौ.मायाताई शिंदे, सौ.सुनीता पाटील, सौ.अनीता लांडगे, सौ.आरती पाटील, शेषराव पाटील, सौ.श्वेता पाटील सौ.लीना भोळे व आश्रमातील कर्मचारी आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील रजिस्ट्रार डी.एम. पाटील, डी.पी.सपकाळ, उपप्राचार्य बी. एस.हळपे, आर.आर.बडगुजर, डॉ.बी. एम.सपकाळ, डॉ.पी.के.लभाने, व्ही.पी. हौसे, डॉ.व्ही.आर.कांबळे, डॉ.सी.आर.देवरे, डॉ. एम.एल.भुसारे, डॉ.व्ही.आर. हुसे, डी.डी. कर्दपवार, डॉ.आर.आर.पाटील, डॉ.एच.जी. सदाफुले, डॉ. जे. जी पाटील, आर.आर.पवार, ए.आर.पाटील, सौ.राजश्री निकम, सौ. डी. एस. पाटील, पी.आर.पाटील, बी.जे.पाटील, व्ही.डी. शिंदे, एस.ओ.बारी, व्ही. एम.पाटील, डी.आर सोनवणे, एम.व्ही.क्षीरसागर, पी.बी.बावीस्कर, सौ.पूनम गाडगीळ, वैशाली सोनगिरे, प्रतीक पाटील, व्ही.के. पटेल, एस.डी.जैन,पी.एस. पाटील, व्ही.एन.पाटील, आर.एस. जैन, के. पी. अग्रवाल, आर.एस.साळुंखे, बी. व्ही.पाटील, जे. ए.सूर्यवंशी एस.बी.देवरे, सौ. एस.एस.पाटील, एस. एस.बोरसे, ए.एस. साळवी, आर. एच. पाटील, जी.एम.राठोड, डी.एस.राठोड, एम.एम. शैख, आर.व्ही.पाटील, वाय.एस. निकम, ए. एच बीडकर इत्यादी प्राध्यापक व शिक्षकेत्तर बंधु-भगिनींनी आर्थिक सहाय्य देवून हा कार्यक्रम राबविण्यास सहकार्य केले.