श्री. गो. से. हायस्कुल पाचोरा चे कलाशिक्षक सुबोध कांतायन सर यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीतखडूंनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाचे मनमोहक रूप साकारले

विठूमाऊली तू माऊली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
प्रत्येक अणू रेणूत भगवंत आहे तो फक्त मनापासून शोधायचा असतो. तो निश्चित च भेटतो
विठ्ठलाचं रुप डोळ्यांत साठवू पाहणाऱ्या वारकऱ्यांना आपल्या विठ्ठलाचं दर्शन तर घडनारच!
परंतु आम्हीही दर्शनासाठी आतुरलेलं असतांना त्या सर्वांगसुंदर रुपाला आम्हाला या वर्षी चित्ररूपात विठुरायाचं दर्शन होणार ते पणआमच्या शाळेतचं!
श्री. गो. से. हायस्कुल पाचोरा चे कलाशिक्षक सुबोध कांतायन सर यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीतखडूंनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाचे मनमोहक रूप साकारले. त्या फलकांवरील चित्रात वारकरी ची विठ्ठल दर्शनाची वारी पण दाखविण्यात आली. ते बघून प्रत्यक्ष वारीचे दर्शन घडलेअसे जाणवते.विठुरायाच्या मुकुटाचे रेखाटन व रंगकाम ही रेखीव झाल आहे.विठ्ठलाचे रूप पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली. संस्थेचे चेअरमन नानासो संजयजी वाघ,व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन यांनी यांनी सर्व भाविकांना विठ्ठलाच्या चित्राच्या माध्यमा तून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील,उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक एन.आर.पाटील, आर. एल. पाटील, ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी चित्राचे दर्शन घेऊन पुढील चित्राच्या नव निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्यात.