पाचोरा श्री.गो.से.हायस्कुल येथे वृक्ष दिंडी उत्साहात संपन्न 

पाचोरा श्री.गो.से.हायस्कुल येथे वृक्ष दिंडी उत्साहात संपन्न

 

पाचोरा, (प्रतिनिधी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कुल मध्ये आज दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी सेवा पंधरवडा निमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड, जतन व संवर्धन या विषयी विविध घोषणा देत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
वृक्ष दिंडी प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एन.आर.पाटील, उपमुख्याध्यापक आर. एल.पाटील,पर्यवेक्षक आर.बी.बांठिया, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.टी.कौंडिण्य, ए. एस.वाघ, डी.डी. विसपुते, यू.एस.पाटील, आर.बी. कोळी, सौ.ए. व्ही. पाटील, श्रीमती .आर. बी. पवार, श्रीमती. जे. व्ही. पोहेकर व इतर शिक्षक बंधू – भगिनी उपस्थित होते.