खंडेराव नगर येथे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण,सत्काराचा कार्यक्रम संपन्न

खंडेराव नगर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण,सत्काराचा कार्यक्रम संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील खंडेराव नगर येथे पाचोरा भडगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते दिनांक ३० जुलै वार रविवार रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी त्यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, माजी नगरसेवक किशोर बारावकर, नंदू बापू सोमवंशी हे उपस्थित होते. यावेळी गणेश बापू पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खंडेराव नगर येथील रहिवासी कृष्णा पाटील सर यांची नुकतीच सोयगाव तालुका शिक्षक पतपेढीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विजय ठाकूर सर यांची नुकतीच जळगाव जिल्हा शिक्षक सेनेच्या संघटक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तर किशोर चौधरी सर यांची पाचोरा तालुक्यात बदली झाली म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांचा सत्कार प्रकाश मदने आदर्श नगर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसंगी परिसरातील खंडेराव नगर, मल्हार नगर, आदर्श नगर, अरिहंत नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जाणून घेतल्या. आणि पुढील कारवाईसाठी सूचना केल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार बी एन पाटील सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक गजू दादा उर्फ सुधीर पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.