पाचोऱ्यात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर संस्थान,कृष्णापुरी यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबीर

रक्तदान श्रेष्ठदान ….!

विठ्ठल मंदिर संस्थान,कृष्णापुरी, पाचोरा व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र , जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने

🩸 रक्तदान शिबिर 🩸

आपण रुग्णांसाठी विठ्ठल होऊ शकतो का

विठ्ठलाची भक्ती रक्तदान करून केली तर ?

आपण रक्तदान केल्याने एखाद्या रुग्णाचे प्राण वाचले तर विठ्ठल माऊली किती खुश होतील…!!!

रक्त हे कृत्रिम रित्या तयार करता येत नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने केलेल्या रक्तदानानेच रुग्णाचे प्राण वाचू शकतात. *सदर गोष्टीचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन विठ्ठल मंदिर संस्थान , कृष्णापुरी ग्रामस्थ* यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

सदर रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त विठ्ठल भक्त व पाचोरा वासीयांनी रक्तदान करावे ही नम्र विनंती. *आपल्या एका रक्तदानाने ३ व्यक्तींचे प्राण वाचू शकतात.* म्हणून सदर दैवी कार्यात आपण सर्वांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करावे.

*रक्तदानाचे फायदे -*

*१)* रक्तदानानंतर तयार होणारे शरीरातील रक्त उच्च कार्यक्षमतेने असते.

*२) रक्तदान केल्यानंतर रक्ताच्या काविळ ब ,काविळ क, गुप्तरोग, मलेरियाच्या व रक्तगट या चाचण्या पूर्णपणे मोफत होतात व त्याचे निष्कर्ष मागणीनुसार कळविलेही जातात, शिवाय ब्लड प्रेशर व पल्स ही प्रत्येक रक्तदानावेळी लक्षात घेतली जाते.*

*३)* नियमित रक्तदात्यांमध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते व *हृदय रोग होण्याचे प्रमाण अतिशय कमी होते.*

*४)* रक्तदानानंतर शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना चालना मिळते व *४८ तासांच्या आत नवीन रक्त तयार होऊन रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.*

*५)* रक्तदात्याला स्वतःसाठी रक्ताची गरज असेल तर सवलत पत्रावरील तारखेपासून *१ वर्षाच्या आत पूर्णपणे मोफत दिले जाते. शिवाय आपले कुटुंबीय, नातेवाईक किंवा मित्र परिवारा पैकी कोणाला गरज पडल्यास सवलतीच्या दरात* रक्तपुरवठा करण्यात येतो.

*६)* एक रक्तदाता प्रत्येक रक्तदानातून *३ रुग्णांचे प्राण वाचवू शकतो* व हे रक्तदान त्याला फार मोठे आत्मिक समाधान मिळवून देते.

७) रक्तपेढी जनकल्याण साखळीतील १४ रक्तपेढ्यांपैकी एक असल्यामुळे रक्तदात्याला इतर १३ ठिकाणाहून रक्त मिळण्याची व्यवस्था करता येऊ शकते.

कृपया आषाढी एकादशी निमित्त जास्तीत जास्त रक्तदात्यांना रक्तदान करावे ही नम्र विनंती.*

*रक्तदानासाठी संपर्क-
९४२२२८३८४२
९४२२२८३८१४