धरणगांव येथील दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा झालीच पाहिजे युवती सेना विस्तारक डॉ.प्रियांका किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन

धरणगांव येथील दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे

या मागणीचे निवेदन युवती सेना विस्तारक डॉ प्रियांका किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वात युवती सेनेच्या वतीने जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले.येथील बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे

डॉ. प्रियंका किशोर पाटील युवासेना (युवती विस्तारक, जळगाव जिल्हा)
धरणगाव शहरातील दोन लहान बालिका एक ८ वर्षीय व दुसरी ६ वर्षीय दोघ बालकुमारी दळण दळण्यासाठी पिठयाच्या गिरणीवर गेले असता गिरणी मालक ६२ वर्षीय नराधमाने एकांताचा फायदा घेऊन गुलाबाच्या फुलासारख्या सुंदर दोघंही बालिकांचा लैगिंक छळ केला. त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. त्यांच्या देहाचे लचके तोडले ही बाब अतिशय संतापजनक असुन दुर्देवी आहे. मानवतेला काळीमा फासणारी आहे. या अत्याचार करण्याऱ्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
आमचा महाराष्ट्र हाआयाबहिणींची अब्रु राखणारा, रक्षण करणारा सन्मान करणारा शिवरायांचा आहे. स्त्री वंदनीय, पुजनीय आहे. स्त्री खऱ्या अर्थाने आमच्या मानवजातीचा वंशवेल वाढविणारी पवित्र माता आहे. स्त्री म्हणजे प्रेम, जिव्हाळा, ममता, वात्सल्य याचं मुर्तीमंत रुप आहे. माता, बहिण, सुन, मुलगी, पत्नी अशा पंचलक्ष्मीच्या रुपाने आमच्या घरात व समाजात वावरत असते. अशा या पवित्र स्त्रीचे रक्षण व संरक्षण करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. नारी अबला नाही ती सबला आहे. स्त्री आपल्या कर्तृत्वाचा ठसा सर्वच क्षेत्रात उमटवित आहे. तरी समाजातील राक्षसी प्रवृत्तीचे नराधमांचा अत्याचार सातत्याने चालुच आहे. म्हणुन धरणगाव शहरातील दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राक्षसास कठोरातील कठोर शिक्षा खुलेआम झालीच पाहिजे. नाहीतर आम्ही युवासेना युवती विस्तारक शिवसेना आघाडीच्या माध्यमाने रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार राहाल. आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्या.