पाचोर्‍यात अग्निपथ योजने विरोधात काँग्रेसचे निदर्शने

पाचोर्‍यात अग्निपथ योजने विरोधात काँग्रेसचे निदर्शने

जळगाव प्रतिनिधी = केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात आज पाचोरा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निदर्शने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार नेहमी जनविरोधी कायदे आणी योजना आणून जनतेचे आणी तरुणांचे भक्त्तिव्य खराब करत आहे . केंद्र सरकारने आता अग्निपथ ही योजना तरुणांसाठी सैन्यदलात भरती होण्यासाठी आणली आहे . या योजनेत भरती होणाऱ्या तरुणांना अग्निंविर म्हटले जाणार असून अग्निपथ योजनेत तरुणांना फक्त ४ वर्षासाठी सामिल करून नंतर त्यांना रिटायर्ड करण्या येणार . ४ वर्षात रिटायर्ड झाल्यानंतर युवकांचे पुढचे भवितव्य काय? अग्निपथ योजना ही तरुणाच्या भावनांशी खेळणारी असून युवकांचे आयुष्य उदध्वस्त करणारी आहे . तरुणांच आयुष्य बरबाद करणारी अग्निपथ योजना त्वरित रद्द करा अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असे पाचोरा तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले . यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शेख इस्माईल शेख फकिरा, इरफान इकबाल मन्यार, संगीता रविंद्र नेवे, शरीफ सादीक शेख, इस्माईल तांबोळी, प्रभाकर अहिरे, अलताफ महेबूब पठाण, अमजद खान, इरफान पठाण, रवि सुरवाडे, शिवदास महाजन, सदु जाधव आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.