शनिशिंगणापूर देवस्थान मधिल घोटाळे बाजावर कारवाई होण्यासाठी ऋषिकेश शेटे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांना आंदोलनाचा लेखी इशारा
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये बोगस ॲपच्या माध्यमातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील संशयित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी भाजपाचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांना एका लेखी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांना प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात वेळोवेळी आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस,नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विधानसभेतील अधिवेशनात आवाज उठवला असता या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रकरणी चौकशी करून भ्रष्टाचारात दोषी सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर व साईबाबा शिर्डी या देवस्थानच्या धर्तीवर या देवस्थानची पुनर्रचना केली जाईल असे त्यावेळी आश्वासन दिले होते.परंतू आज पर्यंत भ्रष्ट लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.पोलीस यंत्रणेचा तपास खुपच कासवाच्या संथ गतीने सुरू आहे.सदर तपास हा जलदगतीने व्हावा आणि भ्रष्ट लोकांवर कडक कारवाई करून जनतेला व शनि भक्तांना न्याय द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे. जर या संदर्भात लवकरात लवकर कारवाई केली नाही तर सर्व शनि भक्तांकडून या शनैश्वर देवस्थानच्या विरोधात फार मोठे आंदोलन उभारले जाईल. आणि होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही आपल्या पोलिस खात्यावर राहील.त्या होणाऱ्या आंदोलना पुर्वीच आपण शनि भक्तांना लवकर न्याय द्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगरचा सायबर सेल विभाग,सहायक धर्मादाय उपआयुक्त अहिल्यानगर, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांना पाठविण्यात आल्या आहेत.या आंदोलनाच्या ईशाऱ्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शनि भक्तांनी शनिच्या डोक्यावर ओतलेले तेल नेमके कोठे जाते याचा सखोल तपास होणे अत्यंत गरजेचे आहे.या तेलाचा वापर पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथिल एका मंगल कार्यालयाजवळ हायवेवर असलेल्या बोगस खाद्य तेल कंपनीच्या माध्यमातून फिल्टर करून लोकांना खाण्यासाठी केला जात आहे.तेल खरेदी करताना मात्र या तेलाचा वापर लोकांच्या खाण्यासाठीच्या खाद्य पदार्थांसाठी केला जाणार नाही असे लिहुन दिलेलं आहे. फिल्टर केलेलं तेल पिशव्या मध्ये पॅकिंग करून राजरोसपणे विक्री केली जात आहे. या कंपनीच्या गेटवर मात्र कुत्र्यापासुन सावधान असा बोर्ड लावलेला आहे.प्रत्यक्षात मात्र कुत्रा कोठेही दिसत नाही.अहिल्या नगरच्या अन्न आणि औषध भेसळ प्रशासन विभागाने या कंपनीवर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे.परंतू हप्तेगीरीमुळे कुंपणच शेत खात असल्याने सामान्य माणसानी न्याय मागायचा कोणाकडे हा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.सदर कंपनीच्या नावाखाली अनेक वर्षांपासून हा संशयित कारभार बिनबोभाट सुरू आहे.आता पर्यंत शनैश्वर देवस्थानने या कंपनीला किती तेलाची विक्री केली याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.कारण पाणी मिश्रीत भेसळयुक्त तेल फिल्टर करून ते लोकांना खाण्यासाठी वापरणे हे लोकांच्या आरोग्यावर किती भयानक परिणाम करणारे क्रुत्य आहे.या तेल भेसळ बहाद्दरावर ही सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य लोकांकडून करण्यात येत आहे.