महाराष्ट्रात विकासाचे परिवर्तन आणण्यासाठी निर्धार यात्रा

महाराष्ट्रात विकासाचे परिवर्तन आणण्यासाठी निर्धार यात्रा

आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रभारी दीपक सिंगला यांचे चंद्रपुरात प्रतिपादन

दिल्ली आणि पंजाब सारखेच परिवर्तन महाराष्ट्रात आणण्यासाठी आगामी निवडणुका लक्षात घेऊन निर्धार यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आम आदमी पार्टीचे दिल्लीचे नेते तथा राज्याचे प्रदेश प्रभारी दीपक सिंगला यांनी चंद्रपुरात दिली.

चंद्रपूर जिल्हा आम् आदमी पक्षातर्फे बालाजी वॉर्ड येथील बालाजी सभागृहामध्ये 10 मे रोजी निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी मंचावर राज्याचे प्रदेश संघटक रंगाची राचुरे, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखेडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे यांनी केले.

याप्रसंगी दीपक सिंगला म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये विकासाची आणखी गरज आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसांनी जर आम आदमी पार्टी ला साथ दिली तर या राज्याचा कायापालट होईल. दिल्लीनंतर पंजाब मध्ये जे परिवर्तन घडले आहे, तेच परिवर्तन महाराष्ट्रात घडविण्यासाठी ही निर्धार यात्रा संपूर्ण विदर्भभर निघाली आहे.
निर्धार मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या तालुका अध्यक्षांनी आजवर केलेल्या पक्ष संघटन आणि पक्ष विस्ताराचा अहवाल सादर केला.

या जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन आरती आगलावे यांनी केले.
जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे,महिला अध्यक्ष ऍड सुनीता पाटिल, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी,शहर सचिव राजु कुडे विधी सल्लागार कीशोर पुसलवार संगठन मंत्री सुजाता बोदेले,महिला सचिव आरती आगलावे, उपाध्यक्ष जास्मिन शेख, महिला उपाध्यक्ष रूपाताई काटकर,रेखा आष्टनकर, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष इंजी. अनुप तेलतुंबडे,अल्का झाड़े, राधा पतरंगे,मनीषा पडगेलवार, युवा उपाध्यक्ष चंदू माडुरवार,अल्पसंख्यक शहर अध्यक्ष अशरफ सैयद,युवा कोषाध्यक्ष कालिदास ओरके,युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे,युवा सचिव डॉ.सचिन अहेर,जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, बल्लारपुर शहर अध्यक्ष रवि पपुलवार,मा.शहर अध्यक्ष ॲड.राजेश विराणी प्रतिक विराणी आसिफ शेख, शहर उपाध्यक्ष अक्षय ठाकुर,शंकर धुमाले,शहर संघटक सुनील भोयर ,शहर उपाध्यक्ष योगेश आपटे,शुभम ठाकुर,कोमल काम्बले,सौरभ कटाने, सुहास रामटेके,वंदना गवली,लक्ष्मण पाटिल,हेमंत पांडे,मुकेश पांडे,अमजद खान तथा जिल्ह्यातून आलेले ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते