कुरंगी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी रंगराव पाटील तर व्हा चेअरमन पदी ज्ञानेश्वर पवार यांची बिनविरोध निवड

कुरंगी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी रंगराव पाटील तर व्हा चेअरमन पदी ज्ञानेश्वर पवार यांची बिनविरोध निवड

कुरंगी ता पाचोरा : १३ उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न
झाल्याने कुरंगी विकास सोसायटीची होणारी निवडणूक बिनविरोध होऊन नुकतीच या संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवड माजी आमदार यांच्यासह नवीन संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झाली .
कुरंगी बांबरुड गटात बांबरुड राणीचे येथील विकास सोसायटी नंतर कुरंगी विकास सोसायटीचे स्वभांडवल मोठ्या प्रमाणावर आहे या संस्थेला खत विभाग जोडलेला असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होते या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक २०२२ ची बिनविरोध घेऊन दिनांक २२ जून रोजी विकास सोसायटीच्या कार्यालयात माजी आमदार दिलीप वाघ बांबरुड राणीचे येथील माजी सरपंच दगाजी वाघ पंचायत समितीचे सदस्य व गटनेते ललित वाघ यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी व्हि . आय. खैरनार, सचिव विकास पाटील यांच्या सह नवनिर्वाचित संचालक यांच्या उपस्थितीत चेअरमनपदी रंगराव भाऊराव पाटील तर व्हा चेअरमन पदी ज्ञानेश्वर शालिक पवार (धनगर) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक भिकाजी पाटील ,रामचंद्र धनगर ,यांच्यासह गणेश पाटील,योगेश ठाकरे , पंढरीनाथ पाटील, दिनकर सोनवणे ,अविनाश कोळी, व शेतकरी उपस्थित होते बिनविरोध संचालक पुढील प्रमाणे तापीराम गोविंदा पाटील, गणेश सुराजी कोळी, शालिग्राम बाजीराव पाटील, मकुंदा नागो पाटील , योगेश माधवराव पाटील ,ज्ञानेश्वर भिवसन पाटील , नंदलाल प्रल्हाद पाटील, अरूण आत्माराम पाटील, रघुनाथ दौलत सोनवणे, रेखा माधव पाटील, अरूणा ताराचंद भोई उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे खत विभाग प्रमुख प्रकाश पाटील व शिपाई संजय जगताप यांनी प्रयत्न केले . सुत्रसंचालन नगराज पाटील यांनी केले आभार सचिव विकास पाटील यांनी मानले.