…..तर गतिरोधक असते तर वाचले असते युवकाचे प्राण;अपघातात तरुणाचा मृत्यू!
पाचोरा:पाचोरा येथे भारत डेअरी स्टॉप जवळ काल रात्री ८ वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात कृष्णापुरी येथील रहिवासी राजू शेलार हे आपल्या पत्नीसह मुला सोबत मोटारसायकलने घरी जात असताना भरधाव येणार दूध टँकरने दुचाकीला धडक दिली होती यावेळी राजू हा टँकर खाली आल्या मूळे पाया चक्काचूर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता अपघात ग्रस्तांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने राजू मिस्तरी सह त्याच्या मुलाला उपचारा करीता रुग्णालयात रवाना केले होते. या अपघातातच कारण म्हणजे गजबजलेल्या भारत डेअरी स्टॉप आणि बाहेर गावाहून ये-जा करणारे प्रवासी मूळे मोठया प्रमाणात होणार गर्दी लक्षात घेता येथे गतिरोधक ची मागणी केली जात होती पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या कडे दुर्लक्ष केल्या मूळे या युवकांचे प्राण गेले स्थानिक नागरिककानीं संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासन निषध केला आहे. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावर मुकाट जनावरे मधोमध बसून वाहतूक अडथळा ठरतात यांचा ही बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

























