श्रीक्षेत्र कुरंगी ते पैठण पायी दिंडी रोप्य महोत्सव सोहळा

श्रीक्षेत्र कुरंगी ते पैठण पायी दिंडी रोप्य महोत्सव सोहळा

नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहर)- येथे सालाबादा प्रमाणे जवळजवळ पंचवीस वर्षांची परंपरा लाभलेले श्रीक्षेत्र कुरंगी ते पैठण पायी दिंडी रोप्य महोत्सव सोहळा दिनांक 14 मार्च वार सोमवार रोजी पंचविसाव्या वर्षी दिंडी प्रस्थान करत असल्याने रोप्यमहोत्सव सोहळा निमित्त माननीय जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव जी पाटील,पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार आप्पासाहेब किशोर आप्पा पाटील यांच्या विशेष उपस्थित दिंडी प्रस्थान होणार आहे या ठिकाणी सकाळी संत एकनाथ महाराज पादुका व ग्रंथपूजन कार्यक्रम माननीय आमदार किशोर आप्पा पाटील व सौ सुनीता ताई किशोर आप्पा पाटील व मुकुंदा अण्णा बिल्दीकर- सपत्नीक यांच्या शुभहस्ते होणार आहेत सकाळी काकड आरती,भजन, व दुपारी रोज हरिपाठ व रात्री हरी किर्तन सोहळा अशा या दिंडीमध्ये संपन्न होणार आहे तसेच दिनांक 14 मार्च पासून ते 22 मार्च पर्यंत नांद्रा पासून ते श्रीक्षेत्र पैठण पर्यंत सकाळ फराळ,चहा पाणी,दुपारचे चहापाणी, जेवण रात्रीचा, मुक्काम अन्नदान असे अन्नदान विविध गावांमधून दानशूर दात्याकडून करण्यात येणार आहे याप्रसंगी दोन अडीच हजार भाविक भक्त या पायी दिंडी मध्ये सहभागी होणार आहेत याबरोबरच पंचवीस ते तीस हरिभक्त परायण कीर्तनकार महाराज व भजनी मंडळ जिल्हाभरातून या ठिकाणी या पायी दिंडीत सामील होत असतात या दिंडीचे संयोजक म्हणून ह भ प कैलासजी महाराज कुरंगीकर,ह भ प प्रकाशजी महाराज कुरंगीकर,विणेकरी राजू महाराज, औषधोपचार सेवा, चोपदार सेवा, कार्यकर्ता अशा विविध सेवा स्वयंसेवक देणार आहेत, याबरोबरच अनमोल सहकार्य मध्ये आप्पासो किशोर पाटील, आण्‍णासो मुकुंदा बिल्दी कर, शालिक बाजीराव पाटील निवृत्त सहायक फौजदार, देवीदास कोळी माजी सरपंच उमाळे यांचे विशेष सहकार्य लाभते श्री संत एकनाथ महाराज जल समाधी सोहळा निमित्त श्री क्षेत्र कुरंगी ते श्रीक्षेत्र पैठण पायी दिंडी प्रसंगी भाविक भक्त यांनी जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदवून या पायी दिंडी मध्ये सामील व्हावे असे आवाहन संयोजक ह भ प कैलासजी व ह भ प प्रकाश महाराज कुरंगी कर यांनी केले आहे