“सत्तेचा गैरवापर हे या सरकारचे खास वैशिष्ट्य” शरदचंद्र पवार यांचे शेवगावच्या सभेत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र

“सत्तेचा गैरवापर हे या सरकारचे खास वैशिष्ट्य” शरदचंद्र पवार यांचे शेवगावच्या सभेत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) ‌ देशातील मोदी सरकार हे सत्तेचा गैरवापर करीत असुन सतत सत्तेचा गैरवापर करणे हे या सरकार मधील राज्यकर्त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.असे टिकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी शेवगावच्या जाहीर सभेत सोडले. ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर काॅंग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, प्रतापराव ढाकणे, दादा कळमकर, राजेंद्र दळवी, महेबुब शेख, शिवशंकर राजळे, प्रभावती घोगरे, नितीन काकडे,बंडू रासने, गहिनीनाथ शिरसाठ हे आवर्जून उपस्थित होते.शरदचंद्रजी पवार साहेब पुढे म्हणाले की ही निवडणूक देशांची आहे.महाराष्ट्राने अतिशय चांगली भूमिका घेतली आहे.केंद्र सरकार गुजरातच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यातीसाठी परवानगी देत आहे.आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी त्यांच काय घोडं मारलं आहे.आमच्या कांद्याला का परवानगी नाही.हे सरकार सत्तेचा गैरवापर करीत आहे हे लक्षात येत आहे.गेल्या दहा वर्षांत सत्ता हातात असताना शेतकरी हिताचे काय निर्णय घेतले.नोटबंदी केली सातशे लोक मेले.काळा पैसा बाहेर काढू म्हणाले मग कुठे आहे तो दाखवा.चांगले काम करणाऱ्या पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल येथील विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबले ही हुकुमशाही आहे.तुम्ही या देशाला संसदीय लोकशाही सोडून हुकुमशाहीच्या वाटेवर नेहुन थांबवले आहे.या देशातील लोकशाहीचा मुलभूत अधिकार हा तुम्ही उध्वस्त करीत आहात असा घनघाती आरोप शरदचंद्र पवार साहेब यांनी केला आहे . शिवाजीराव काकडे वकिल आणि हर्षदाताई काकडे यांनी या शेवगाव तालुक्यातील गावांना ताजनापूर लिफ्ट चे पाणी मिळावे म्हणून फार मोठा संघर्ष केला आहे. ते माझ्याकडे आले आणि मग आम्ही पाटबंधारेच्या मंत्र्यासह अधिकाऱ्यांची भेट घेतली पण तो प्रश्न अजूनही सुटलेला नाही.शेवगावच्या मिनी एमआयडीसी साठी सरकार दरबारी प्रस्ताव पडून आहे. अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी भागात विकासाच्या कामाला गती द्यायची असेल तर लंकेना निवडून द्या असे आवाहन पवार साहेब यांनी केले.लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, यांच्या निवडणूका का घेतल्या नाहीत लोकांच्या हातातील सत्तेचे निर्णय घ्यायचे नाहीत ही हुकुमशाही नव्हे काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली देशाची घटना टिकवली पाहिजे त्यासाठी लंकेना निवडून द्या.राज्यकर्ते हे मोदींना हुकुमशाहा बनविण्यात व्यस्त आहेत.असे पवार यांनी सांगितले.माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता पुत्राचे नाव न घेता जोरदार टीका केली.ही लढाई मोठ्या धनदांडग्यांच्या विरोधात आहे. यांना सत्तेचा आणि पैशाचा दर्प आहे. सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर ही निवडणूक आपण सहज बाजी मारत जिंकू हा तुमचा भ्रम आहे पण तुमचा गर्व हरण केल्या शिवाय आम्ही राहणार नाही असे विखेंना उद्देशून थोरात यांनी सांगितले. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.या जाहीर सभेत विखे पाटील विरुद्ध शरदचंद्र पवार यांच्या संघर्षाचा खरा सामना पहायला मिळाला आहे.विखेंनीही पवार यांच्या वर तोफ डागण्या साठी व्युहरचना केली आहे. या निवडणुकीत विखे पाटील आणि पवार साहेब यांच्या धारदार संघर्षाची जोरदार चिन्हे पहावयास मिळत आहेत. पवार यांच्या आरोपांना विखेपाटील नेमके काय उत्तर देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.