चोपडा महाविद्यालयात दि.०७ फेब्रुवारी रोजी ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि. ०७ फेब्रुवारी,२०२५ रोजी ‘वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे’ आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमाप्रसंगी विविध विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या तसेच वक्तृत्व स्पर्धा विजेते व बेस्ट स्टुडंट अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या कार्यकारणीचे सदस्य डॉ.दीपक पाटील, चोपडा येथील मालती हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. आनंद राजाराम पाटील, उद्योजक श्री. संजय अग्रवाल, चोपडा येथील शासकीय कंत्राटदार अनिल कदम तसेच चोपडा येथील जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता विलास सुकलाल पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित राहणार असून संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आशाताई विजय पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी दि.०७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘वार्षिक पारितोषिक वितरण’ कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी,
उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल,
उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ. ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस.पी.पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एन.बोरसे, कनिष्ठ विभागाचे समन्वयक श्री.पी.एस.पाडवी आणि वरिष्ठ विभागाचे पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख व्ही.पी.हौसे व कनिष्ठ विभागाचे पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख श्री.एस.टी.शिंदे यांनी केले आहे.