गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात संपन्न

गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात संपन्न….!!!!

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथे २१ जून रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमात सर्वप्रथम माननीय प्राचार्य सुनिल पाटील यांनी प्रास्ताविकातुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत होत असलेल्या योग दिवसाचे महत्त्व अतिशय सुंदर शब्दांत विषद केले,त्यानंतर प्रत्यक्षात विविध आसनांच्या प्रात्यक्षिकासोबत त्या आसनाने आपल्या जीवनात कसा लाभ होतो याचे स्पष्टीकरण एस.ए.वाघ यांनी प्रत्यक्षात आसन करुन समजावले,त्यांच्यासोबत क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे यांनी योगासने केली, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोठ्या उत्साहानं योग दिनात योगासने करुन सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्राचार्य आदरणीय सुनिल पाटील तसेच पर्यवेक्षक आदरणीय अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मेहनत घेतली.