कुरंगी हे गाव खासदार उन्मेशदादा पाटील यांनी घेतले दत्तक

कुरंगी हे गाव खासदार उन्मेशदादा पाटील यांनी घेतले दत्तक

बलुन बंधारा जलसिंचन प्रोजेक्ट १४ महिन्यापासुन पर्यावरण मंत्री यांची सही व पर्यावरण खात्याची मंजुरी न मिळाल्याने थांबला ?? सही कशासाठी अडकली ?? खमंग चर्चांना उधाण

{ गिरणा पुनरूज्जीवन अभियान अंतर्गत गिरणा परीक्रमा पदयात्रा करत असतांना गिरणामाईचे संवर्धन,प्रदुषण आणि शोषण थांबविण्यासाठी कुरंगी गावकरी यांनी मागील गेले तीन वर्षापासुन १००% अवैध वाळु चोरी, अतिक्रमण आणि गेल्या १ जानेवारी पासुन १००% अवैध धंदे – दारू पत्ते सट्टा बंद करून दाखवल्याने भाजप तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खा.उन्मेशदादा पाटील यांनी कुरंगी हे गाव दत्तक घेण्याची घोषणा केली }

*जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, पंचायत समिती सदस्य बन्सिलाल पाटील,भाजप नेते सदाशिव आबा यांची प्रमुख उपस्थिती*

*जळगाव राजकारण ग्रुप :* ” *परिक्रमा सिंचन वृध्दीची…. गिरणेच्या शाश्वत विकासाची “* स्वातंत्र्याच्या *अमृत महोत्सव निमित्ताने गिरणा माईचे संवर्धनासाठी माननीय खासदार उन्मेशदादा पाटील* यांच्या संकल्पनेतुन आयोजित *” गिरणा पुनरूज्जीवन अभियान “* अंतर्गत *गिरणा परीक्रमा ( पदयात्रा ) दुसरा टप्पा* काल शनिवार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी *उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.*

सकाळी ८ वाजेपासुन *पदयात्रेला प्रारंभ झाला – दहिगाव संत – डोकलखेडा – वरसाडे – माहिजी – कुरंगी – दुसखेडा – शेवटी परधाडे* या गावी येथे या परीक्रमेची दुसरे टप्प्याची सांगता जन आशिर्वादाने झाली.

हे परीक्रमा करतांना – गावागावात जाऊन *खासदार उन्मेशदादा पाटील आणि भाजप तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे* यांनी दुसरे टप्प्यातील परीक्रमेतील सर्व गावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधला.मागील दोन वर्षापासुन कोवीड -१९ असल्याने भेटी-गाठी न झाल्याने गिरणा संवर्धन परीक्रमा पदयात्रेच्या माध्यमातुन का होईना ? जवळ येण्याचा योग आल्याने जनतेच्या सर्व समस्या ऐकुन घेतल्या आणि लेखी निवेदन देखील घेतले.काही समस्या जागेवर सोडवल्या तर काही समस्या या वर्षाअखेर सोडवण्याचे वचन दिले.

*गिरणा परीक्रमा ( पदयात्रा ) हा कुठलाही राजकीय अजेंडा नसुन* गिरणा नदी हि आयसीयु मध्ये गेल्याने मागील ५० वर्षात सातत्याने होणारे शोषण – अतिक्रमण आणि *अवैध वाळु उपसामुळे काही ठिकाणी दगड लागल्याने पुढील भवितव्य हे अंधारात जाणार असल्याने* आपल्या भागातील लोकांना *संजीवणी व अमृत ठरणारी एकमेव जीवनवाहिनी- रक्तवाहिणी – सर्वांना जोडणारी नाळ म्हणजे गिरणामाई !!*

हिच गिरणामाई जर आपण नाही वाचवली किंवा प्रयत्न आतापासुन नाही केले तर मागील ५० वर्षात काहीच प्रयत्न न झाल्याने *पुढील १०-ते ५० वर्षात पाण्याचे फार मोठे संकट उद्भवण्याची शक्यता जलस्त्रोत तज्ज्ञ मंडळी यांनी वर्तवल्यानंतर* महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील ज्या नद्यांची परीस्थिती गंभीर व चिंताजनक ठरली आहे व ठरणार आहे.त्या प्रमुख नद्या पैकी गिरणा नदीचा देखील त्या चिंताजनक परीस्थिती यादीत नाव समाविष्ट झाले आहे.

*आज हि पदयात्रा – फक्त जनजागृती आहे.* आता लोकांना या अभियानाद्वारे जागृत करून – गिरणामाईचे होणारे शोषण, अतिक्रमण आणि प्रदुषण जर आपण आजपासुन नाही थांबवले तर भविष्यात पाण्याच्या व पर्यावरणाच्या फार मोठ्या संकटाला जावे लागेल.आज या गिरणामाई’वर पिण्याच्या विहीरीसह शेती सिंचनासाठी सिंहांचा वाटा आहे.सर्वांचा विकास शेतीशी निगडित असल्याने आणि शेती हि पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी हे गिरणा नदीतुन मुख्य प्रवाह असल्याने – जसे *तापीखोरे हे १२ महिने दुथडी वाहते* तर आपले गिरणामाई’ची अवस्था बघुन फार दु:ख झाल्याने हा विडा मी उचलला आणि गिरणा बचावं हि संकल्पना ठेऊन आगामी काळात कडक उपाययोजना करण्यापुर्वी *जनजागृती करून लोकांना या मोहीमेत सक्रीय व सहभागी करून घेण्यासाठी या पदयात्रेचे व परीक्रमेचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील बोलले.*

तर *लवकरच गिरणा नदीवर बलुन बंधारे बनवण्याच्या महाप्रोजेक्ट सुरूवात होईल* – आजपर्यंत बलुन बंधारा प्रोजेक्ट हवेत होता पण मी आल्यानंतर २० विभागाच्या परवानग्या मिळवुन *अंतीम मंजुरीसाठी पर्यावरण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठवली असता गेल्या १४ महिन्यापासुन – पर्यावरण मंत्री यांची स्वाक्षरी न झाल्याने ? हा बलुन बंधारा प्रोजेक्ट अडकला आहे.* लवकरच पर्यावरण मंत्रींची सही झाली कि, हिरवा झेंडा दाखवला तर हा प्रोजेक्ट’ला मंजुरी मिळवुन कामाला सुरुवात करता येईल ? आणि *बलुन बंधारा प्रोजेक्ट पुर्णत्वास गेल्यानंतर आपला परीसर सुजलाम सुफलाम होईल आणि शेतीचा व शेतीवर आधारित उद्योग व्यवसायांचा भरभराटी होईल.शेतकरी आर्थिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम होईल.

पर्यावरण मंत्रीची सही १४ महिन्यापासुन का अडकली आहे ? या खमंग चर्चेला सुरुवात झाली आहे ?

आणि या गिरणा संवर्धनाचा खरा विडा गेल्या तीन वर्षापासुन कुरंगी गावाने उचलला असुन – १००% वाळु चोरी ,उत्खननं,प्रदुषण,शोषण आणि अतिक्रमण थांबवल्याने आमची सुरू असलेले गिरणा परीक्रमा – *गिरणामाई संवर्धन व रक्षण आणि पुनरूज्जीवन अभियान खर्या अर्थाने आज कुरंगीकरांनी खरे ठरवले.

जसं *कुरंगी गावाने लोकसहभागातून जे करून दाखवले* तसेचं जळगाव लोकसभा मतदारसंघातील गिरणा काठावरील सर्व गावांनी विडा उचलावा व आदर्श घ्यावा आणि परीवर्तनाची सुरूवात करावी अशी उद्घोष भाजप तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

तर १ जानेवारी २०२२ पासुन १००% अवैध धंदे – दारू पत्ता सट्टा बंद करून दाखवल्याने अनेक उध्वस्त होणारे कुटुंब वाचणार आहे.त्याबद्दल खासदार उन्मेशदादा पाटील यांनी कुरंगीकरांचे तोंडभरून कौतुक केले.

जळगाव जिल्ह्यातील सक्रीय सहभाग व लोकसहभाग असलेले एकमेव असं गावं असल्याने १००% वाळु चोरी व १००% अवैध धंदे बंद करणारे हे कुरंगी गाव असल्याने – कुरंगी हे गाव आदर्शगाव आराखाड्यात घ्यावे यासाठी जिल्हाधिकारी यांना सांगणार असुन – कुरंगी हे आदर्शगाव खासदार या नात्याने ग्रामविकासासाठी मी दत्तक घेत असुन* मागील अवधित राहिलेला निधी भरून काढुनी राहिलेल्या सर्व समस्या,प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबध्द राहिल आणि *येत्या २६ जानेवारीपासुन या शुभ कार्याची सुरुवात होईल अशी घोषणा खासदार उन्मेशदादा पाटील यांनी भाजप तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे* व जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे पंचायत समिती सदस्य बन्सिलाल पाटील भाजप नेते सदाशिव आबा सह कुरंगी ग्रामस्थांच्या *उपस्थितीत केली.

यावेळी पंचक्रोशीतील नागरीक व सरपंच उपस्थित होते. पहाण सरपंच यांनी नांद्रा सर्कलमधील *पिकविमा रक्कम* अद्यापपर्यंत शेतकरींना न मिळाल्याचे सांगितले तर अजयकुमार जैस्वाल *यांनी माहिजी गिरणा नदीवर पुल – तसेच माहिजी रेल्वेस्थानकांवर किमान दोन एक्स्प्रेस- सकाळची मुंबईकडे जाणारी सेवाग्राम/काशी आणि सायंकाळची मुंबईहुन येणारी कामयाणी/महाराष्ट्र एक्सप्रेस चा थांबा मिळण्याची व दुचाकी गाड्यांसाठी बंद पडलेला भुयारी मार्ग सुरळीत करण्याची मागणी केली.*

*यावेळी मोठ्या संख्येने* तरूण , महिला,ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच मनिषाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्या सिमाताई नगराज पाटील,मंगलाताई पंढरीनाथ पाटील यांनी स्वागत तर *आभार ग्रा.पं.सदस्य योगेशभाऊ ठाकरे यांनी मानले‌.*