पिंपळगाव हरेश्वर साठी गौरवास्पद ‘चांद्रयान-३’च्या लाँचिंगमध्ये पिंपळगाव हरेश्वर च्या सुपुत्राचा ‘खारीचा वाटा’

पिंपळगाव हरेश्वर साठी गौरवास्पद ‘चांद्रयान-३’च्या लाँचिंगमध्ये पिंपळगाव हरेश्वर च्या सुपुत्राचा ‘खारीचा वाटा’

 

पिंपळगाव हरेश्वर साठी गौरवास्पद! ‘चांद्रयान-३’च्या लाँचिंगमध्ये पिंपळगाव हरेश्वर च्या सुपुत्राचा ‘खारीचा वाटा’
Chandrayaan-3: इस्रोच्या चांद्रयान- ३ मोहिमेत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावातील सुपुत्र ऋषिकेश सावळे याचा सहभाग आहे. या मोहिमेच्या माध्यमातून तालुक्याची मान उंचावली आहे.
पुणे : चांद्रयान- ३ ही मोहीमेची यशस्वी सुरुवात झाली. आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील केंद्रावरून चांद्रयान-३चे यशस्वी उड्डाण झाले. आता ४२ दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी त्याचे सॉफ्ट लँडिंग होणार आहे. या ठिकाणी दहा दिवस थांबून तेथील अभ्यास केला जाणार आहे. या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील ऋषिकेश सावळे याचा जुनिअर सायन्टिस म्हणून सहभाग होता. त्यांचाही ही मोहीम यशस्वी होण्यात मोठा वाटा आहे. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावचे सुपुत्र आणि पिंपळगाव हरेश्वर येथील प्राथमिक शिक्षण पिंपळगाव हरेश्वर येथील खाजगी पाथमिक विद्या मंदिर येथे तर माध्यमिक शिक्षण ग्राम विकास विद्यालयात पूर्ण करून पुढचे शिक्षण Government College Jalgaon येथे घेतले त्या पुढील शिक्षण पुणे येथील सिंहगड कॉलेज येथे पूर्ण करुन २०१७ लाख ISRO येथे ज्युनिअर सायंटीस म्हणून नियुक्ती झाली.चांद्रयान २ चांद्रयान ३ मोहिमेत सहभागी झाले.चांद्रयान ३ मध्ये इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असलेले मयुरेश शेटे यांनी पाचोरा तालुक्याची मान उंचावली आहे.
ऋषिकेश सावळे हे पिंपळगाव हरेश्वर येथील केंद्र प्रमुख कै.रमाकांत शंकर सावळे यांचा मुलगा आहे.तसेच ग्राम विकास विध्यालायातील उपशिक्षक अर्जुन सावळे सर यांचा पुतण्या आहे त्याने चांद्रयान मध्ये विक्रमा ल्यांडर वर काम केले आहे.
देशाच्या या अभिमानास्पद कामगिरीत तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावचे सुपुत्र आणि माजी विद्यार्थ्याचा सहभाग असल्याने गावचे नाव देश पातळीवर पोहचवण्याचे काम यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे ग्राम विकास मंडळ अध्यक्ष पिंपळगाव हरेश्वर.ता.पाचोरा प्रकाश बाजीराव पाटील चिटणीस:-सुखदेव विठ्ठल गीते.संचालक:-भास्कर धनजी पाटील संचालक:-दिपक हरसिंग सोनावणे, संचालक:-रंगलाल गोविंदा राठोड, संचालक :- रंजीता मनोज बडगुजर, संचालक:- भैय्या विलास मधुकरराव गरुड,संचालक:- दिलीप फुलचंद जैन,संचालक:- कडुबा बालचंद तेली,संचालक:- डॉ.शांतीलाल गेंदीलाल तेली, संचालक:- जनार्दन ओंकार देव,संचालक :- अशोक कृष्णराव पाटील,संचालक:- अशोक दत्तू पाटील,संचालक:- प्रदीप रघुनाथ बडगुजर,संचालक:- सुरेश काशिनाथ बडगुजर,ग्राम विकास विद्यालय मुख्याध्यापक प्रमोद महाजन,खाजगी प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक शशिकांत महालपुरे,गावातील माजी विध्यार्थी संघ,गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
२२ जुलै २०१९ रोजी भारताने राबवलेली चांद्रयान २ ही मोहीम अयशस्वी ठरली होती. तेव्हा आपले यान यशस्वीपणे चंद्रावर पोहचले परंतू सॉफ्टलॅडिंग न होता, ते क्रॅश झाले होते. परंतू अपयशाने खचून न जाता इस्त्रोचे प्रमुख एम. सोमनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा चांद्रयान-३ मोहीम मोठ्या आत्मविश्वासाने आखली आहे. ती यशस्वी देखील करून दाखवली आहे.